मुलींनाही भारतीय सैन्यात भरतीची सुवर्णसंधी, पुण्यासह देशातील 6 ठिकाणी भरती

मुलींनाही भारतीय सैन्यात भरतीची सुवर्णसंधी, पुण्यासह देशातील 6 ठिकाणी भरती

भारतीय सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणींसाठी संरक्षण विभागाने एक सुवर्णसंधी दिली आहे (Recruitment opportunity for Girls in Indian Army).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 29, 2020 | 4:19 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र, भारतीय सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणींसाठी एक सुवर्णसंधी आहे (Recruitment opportunity for Girls in Indian Army). संरक्षण खात्याने सैन्यात दाखल होण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीमुळे भारतीय मुलींना सैन्याच्या पोलीस विभागात दाखल होता येणार आहे. याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सैन्याने ठरवून दिलेल्या योग्यतेचे निकष पूर्ण करणाऱ्या मुली 31 ऑगस्टपर्यंत सैन्याची वेबसाईट www.joinindianarmy.nic.in येथे जाऊन ऑनलाईन नोंदणी करु शकणार आहेत. पुण्यासह देशभरातील 6 प्रमुख केंद्रांवर ही भरती प्रक्रिया पार पडेल.

मुलींसाठी भारतीय सैन्यात दाखल होण्याची पहिली संधी मागील वर्षी मिलिट्री पोलीस भरतीच्या रुपाने उपलब्ध झाली. मागील वर्षी एकूण 100 पदांसाठी ही भरती झाली होती. यावेळी 99 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पुणे, लखनौ, अंबाला, जबलपूर, बेंगळुरु आणि शिलाँग या केंद्रांची निवड करण्यात आली.

भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना दहावीत 45 टक्के गुण असणं बंधनकारक आहे. वय साडेसतरा ते 21 वर्षे असणारे उमेदवार या प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत. त्यांची उंची कमीत कमी 152 सेमी असावी. ऑनलाईन नोंदणीनंतर सैन्याचा परीक्षा विभाग उमेदवारांच्या गुणांची कट ऑफ मेरिट लिस्ट जाहीर करेल. त्यानुसार पुढे भरती प्रक्रिया पूर्ण होईल.

मेरिटमध्ये नाव येणाऱ्या मुलींना ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र दिले जाणार आहे. परीक्षेत एकसारखे गुण मिळणाऱ्या मुलींपैकी अधिक वय असणाऱ्या मुलीला प्राधान्य दिले जाणार आहे. या भरतीसाठी येणाऱ्या मुलींना 1.6 किमी अंतर धावावं लागेल. हे अंतर 7:30 मिनिटांमध्ये पूर्ण करणाऱ्या मुलींना गट क्रमांक 1 मध्ये तर 8 मिनिटांमध्ये अंतर पूर्ण करणाऱ्या मुलींना गट क्रमांक 2 मध्ये स्थान मिळणार आहे.

धावल्यानंतर उमेदवारांना 10 फूट लांबउडी मारावी लागेल. तसेच 3 फूट उंचउडी मारावी लागणार आहे. भरतीत निवड झालेल्या आणि प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना वैद्यकीय प्रमाणपत्र देखील सादर करावं लागणार आहे.

हेही वाचा :

भारतात येण्याआधीच राफेलच्या कामगिरीची चर्चा, चीनसारख्या देशाला भीती का वाटते?

PoK मधून 250-300 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत, कुपवाडात 2 जणांचा खात्मा

भारतीय लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना Facebook, Tik Tok सह 89 अ‍ॅप डिलीट करण्याचे आदेश : सूत्र

Recruitment opportunity for Girls in Indian Army

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें