भारतीय लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना Facebook, Tik Tok सह 89 अ‍ॅप डिलीट करण्याचे आदेश : सूत्र

भारतीय लष्कराने आपल्या जवानांना फेसबुक, टिक-टॉक, ट्रूकॉलर आणि इन्स्टाग्रामसारखे अ‍ॅप्स स्मार्टफोनमधून डिलीट करण्यास सांगितलं आहे.

भारतीय लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना Facebook, Tik Tok सह 89 अ‍ॅप डिलीट करण्याचे आदेश : सूत्र
फेसबुकचे स्मार्टवॉच येणार
Nupur Chilkulwar

|

Jul 09, 2020 | 1:10 AM

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय लष्कराने (Indian Army) एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय लष्कराने आपल्या जवानांना फेसबुक, टिक-टॉक, ट्रूकॉलर आणि इन्स्टाग्रामसारखे अ‍ॅप्स स्मार्टफोनमधून डिलीट करण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराने अशा 89 अ‍ॅप्सची यादी जारी केली आहे. हे अ‍ॅप्स जवानांना त्यांच्या स्मार्टफोनमधून डिलीट करावे लागतील. भारतीय लष्कराची कुठलीही माहिती लीक होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली (Indian Army Asked Its Personnel To Delete 89 Apps From Their Smartphone).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

लष्कराने जे अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितलं आहे, त्यामध्ये Facebook, Tik Tok च नाही तर Likee, युसीब्राऊझर आणि पबजी सारखे प्रसिद्ध अ‍ॅप्सचाही समावेश आहे. त्याशिवाय टिंडर सारख्या डेटिंग अ‍ॅप्सलाही डिलीट करण्यास सांगितलं आहे.

भारत-चीन सिमावादाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने चीनला झटका देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. या अ‍ॅप्समध्ये टिक-टॉक, युसीब्राऊझर, शेअरइट सारख्या अनेक प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश आहे. त्मयाशिवाय, हेलो, लाईक, कॅम स्कॅनर, शीन या सर्व अ‍ॅप्सवरही बंदी घालण्यात आली आहे.

भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी

काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या लष्करात झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यानंतर देशभरातून चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्याशिवाय, या अ‍ॅप्समार्फत भारतीयांची माहिती चोरली जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली होती.

गुप्तचर संस्थांनी 52 अ‍ॅप्सची नावं सरकारला दिली होती, ज्यांच्यावर हेरगिरीची शक्यता होती. त्यानंतर सरकारने तब्बल 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली.

Indian Army Asked Its Personnel To Delete 89 Apps From Their Smartphone

संबंधित बातम्या :

लादेनला शहीद म्हणणाऱ्या इम्रान खान यांची कोंडी, भारताकडून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

चीनने भूतानलाही डिवचले, सीमा वादावर कुणीही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप न करण्याची भाषा

Chinese Apps Ban | चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अ‍ॅप्सचं पुढे काय होणार?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें