AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर! मुस्लिमबहुल भागात कमळ फुलणार? भाजपने विरोधकांना कसं पछाडलं?

पश्चिम बंगालच्या पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. मुस्लिमबहुल भागात कमळ फुलण्याची शक्यता आहे.

पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर! मुस्लिमबहुल भागात कमळ फुलणार? भाजपने विरोधकांना कसं पछाडलं?
bjp flag
| Updated on: Oct 09, 2026 | 12:40 PM
Share

Rejinagar By-Election Result 2026: पश्चिम बंगालच्या दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर बाजी मारली होती. त्यानंतर त्यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ सोडला होता. नंदीग्राम मतदारसंघ हा एकेकाळी ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जायचा. या व्यतिरिक्त हुमायू कबीर यांनी विधानसभेच्या निवडणूकीत दोन जागांवर बाजी मारली होती. त्यानंतर त्यांनी रेजीनगरमधून राजीनामा दिला होता. रेजीनगर मुस्लिमबहुल मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात भाजप व्यतिरिक्त काँग्रेस, ममता बॅनर्जी यांची टीएमसी, डाव्या पक्षांनी मुस्लिम उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. या मतदारसंघातील मतमोजणीचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत. या ठिकाणी भाजपचा उमेदवार आघाडीवर असल्याचे समोर आलं आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, चार फेऱ्या झाल्यानंतर भाजप (BJP) उमेदवार शाखाराव सरकार 23 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर कबीर याचे पूत्र गुलाम नबी आझाद यांना आतापर्यंत 12707 मते मिळाले आहेत. ते दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. या मतदारसंघात काँग्रेस आणि ममता बॅनर्जी गट पिछाडीवर आहे.

पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यास बंगालच्या राजकारणात मोठा संदेश जाण्याची शक्यता आहे. तर ममता बॅनर्जी गटासाठी देखील मोठी परीक्षा असणार आहे. यंदा ममता बॅनर्जी यांना पक्षाचं नवीन नाव आणि चिन्हासोबत मैदानात उतरावं लागलं. या मतदारसंघात भाजपचा विजय झाला, तर जनतेत वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे. भाजप पक्षाकडे पारंपरिक मतदारांसहित मुस्लिम मतदार देखील आकर्षित होऊ लागला आहे, असा संदेश देशात जाईल.  काही दिवसापूर्वी, आम्ही बळजबरीने श्रीरामचा नारा देण्यास सांगत नाही, असं विधान शुभेंदू अधिकारी यांनी केलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी म्हटलं होतं की, आताचा काळ हा राम मंदिर आणि बाबरी मशि‍दीचा नाही. तर विकासाची भाषा करण्याचा विषय आहे. राजकीय विश्लेषकाच्या माहितीनुसार, या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे जनमत म्हणून पाहू नये. यातून फक्त निवडणुकीच्या ट्रेंडचा प्राथमिक अंदाज मिळू शकतो. परंतु खरा अंदाज हा सरकारच्या कामगिरीतून दिसून येईल.

Follow Us
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?