
येत्या 26 जानेवारी 2026 रोजी भारत आपला 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सज्ज आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वेळी राजधानी दिल्लीमधील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य प्रजासत्ताक दिन परेडबद्दल देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. हा ऐतिहासिक सोहळा भारताची लष्करी ताकद, सांस्कृतिक विविधता, तांत्रिक प्रगती आणि देशभक्तीची भावना यांचे दर्शन घडवतो. त्यामुळे वर्षातील सर्वात प्रतीक्षित अशा या राष्ट्रीय उत्सवाची सगळेच नागरिक उत्सुकतेने वाट पहात असतात.
काय असेल खास ?
यंदाचा सोहळाही असाच खास असणार आहे. या वर्षी 26 जानेवारीला, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सशस्त्र दलांचा – अर्थात लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा भव्य मार्च-पास्ट पाहायला मिळणार आहे. त्यामधून शिस्त, समन्वय आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रदर्शन होईल. प्रेक्षकांना लढाऊ विमानांच्या हवेतील चित्त थरारक कसरती, तसेच प्रगत संरक्षण उपकरणे आणि स्वदेशी लष्करी तंत्रज्ञानाचे सादरीकरण पाहण्याची देखील संधी मिळेल.
हे असेल प्रमुख आकर्षण
प्रजासत्ताक दिनाच्या या परेडचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे देशातील विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे सादर करण्यात येणार रंगीबेरंगी चित्ररथ (झांकी). या परेडला उपस्थि राहणाऱ्यांसाठी आणि टीव्हीवरूनही यही परेड पाहणाऱ्यांसाठी या ढांक्या किंवा चित्ररथ म्हणजे अतिशय महत्वाचे आकर्षण ठरते. या झांक्यांमधून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, पारंपरिक कला प्रकार, पर्यटन क्षमता, सामाजिक उपक्रम आणि विकासात्मक कामगिरी यांचे सजीव दर्शन घडते, ज्यातून देशातील विविधतेचे सुंदर प्रतिबिंब दिसते.
शालेय विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, लोककलाकार आणि सांस्कृतिक कलाकारही या सोहळ्यात सहभागी होतील, ज्यामुळे उत्सवात चैतन्य आणि आनंदी वातावरण निर्माण होईल. या कार्यक्रमाला प्रमुख राष्ट्रीय नेते, परदेशी मान्यवर आणि प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित राहणार आहेत, ज्यातून भारताची वाढती जागतिक ओळख अधोरेखित होईल.
देशाचा प्रजासत्ताक दिन हाँ 1950 सालच्या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीची आठवण करून देतो आणि तो लोकशाही, एकता व राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. ही परेड भारताच्या प्रवासाची, यशस्वी वाटचालीची आणि भविष्यकालीन आकांक्षांची आठवण करून देणारी ठरते.