AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Republic Day : ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरु नका!, शेतकऱ्यांच्या परेडपूर्वी उत्तर प्रदेश सरकारचा आदेश

उत्तर प्रदेश सरकारनं सर्व जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना आंदोलक शेतकऱ्यांना डीझेल देऊ नका, असा आदेश दिला आहे.

Republic Day : ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरु नका!, शेतकऱ्यांच्या परेडपूर्वी उत्तर प्रदेश सरकारचा आदेश
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jan 24, 2021 | 6:45 PM
Share

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेड काढण्याची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला आडकाठी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण उत्तर प्रदेश सरकारनं सर्व जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना आंदोलक शेतकऱ्यांना डिझेल देऊ नका, असा आदेश दिला आहे. त्यामुळे डिझेलविना ट्रॅक्टर रॅली कशी निघणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.(Uttar Pradesh govt orders not to fill diesel in tractors on the backdrop of farmers’ parade)

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्याचा विचार करणाऱ्या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर टिकैत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, सरकार तुम्हाला डिझेल देत नसेल तर तुम्ही आहात त्या ठिकाणीच रस्ते बंद करा. मुरादाबादच्या पूर्व भागातील गाजीपूरपर्यंतच्या शेतकऱ्यांनी आपल्याला ही माहिती दिल्याचं टिकैत यांनी सांगितलं.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडच्या मार्गाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी 5 मार्गांना परवानगी दिली आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर योगेंद्र यादव यांनी सांगितलं की दिल्ली पोलिसांनी अधिकृतरित्या 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेडला मंजुरी दिली आहे. जे शेतकरी आपले ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह दिल्लीच्या सीमेवर आले आहेत. त्यांनी ट्रॉली जागेवरच सोडून फक्त ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत यावं. शेतकरी शांतपणे ट्रॅक्टर परेड काढतील, असं योगेंद्र यादव यांनी सांगितलं.

‘काही अदृश्य शक्तीमुळेच तोडगा नाही’

26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तर कोणती तर काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा निघत नसल्याचा दावा केला. मात्र, ही अदृश्य शक्ती कोणती? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. शेतकरी आंदोलनाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्रसिंह तोमर यांनी मीडियाशी संवाद साधून हा आरोप केला. कोणती तरी अदृश्य शक्ती आहे. त्यांनाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू नये असं वाटतं. नाही तर आमच्याशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांनी वेगळाच राग अळवला नसता, असा दावा तोमर यांनी केला.

संबंधित बातम्या :

काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा

सरकारनं चीनच्या सैनिकांना सीमेवर रोखण्याऐवजी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर अडवलं: राहुल गांधी

Uttar Pradesh govt orders not to fill diesel in tractors on the backdrop of farmers’ parade

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...