AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांचं महत्वाचं वक्तव्य

Mohan bhagwat : सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी मोठं भाष्य केलं आहे. युवकांशी संवाद गरजेचा असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.

CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांचं महत्वाचं वक्तव्य
| Updated on: Jul 25, 2026 | 8:00 AM
Share

देशभरात कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाचं लोण पसरलं आहे. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर उपोषण सोडल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. सरकार आणि कॉक्रोच जनता पक्षाच्या प्रतिनिधींची भेटून चर्चा होत आहे. दिल्लीतील जनता पार्टीच्या आंदोलनाचा भडका महाराष्ट्रातही उडाला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या संख्येने तरुणांचे मोर्चे निघत आहेत. अनेक सेलेब्रिटी मंडळी जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत आहे. या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे मोठं भाष्य केलं आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांचा दिल्लीतील आंबेडकर भवनात विश्वमांगल्य सभेत ‘युगानुकूलत्व मातृत्व’ कार्यक्रमात विद्यार्थी आंदोलनावर मोठं भाष्य केलं. मोहन भागवत यांनी म्हटलं की, ‘युवा पिढी आता प्रश्न विचारू लागली आहे. आपण प्रश्न विचारत नव्हतो. आताचं युग वेगळं आहे. युवकांसोबत संवाद महत्त्वाचा आहे. त्यांना आदेश देता येणार नाही. नवीन पिढी विश्लेषण करत असते. त्यामुळे आपल्याला संवाद साधण्याची पद्धती बदलावी लागेल’. ‘आधीच्या काळात आज्ञांचं पालन करण्याचा काळ होता. आई-वडिलांनी जे म्हटलं, त्यावर कोणतीही चर्चा होत नव्हती. त्यांचा आदेशानंतर शांत राहावं लागत होतं. त्यांच्यावर विश्वास होता. आपला त्यांच्या अनुभवावर विश्वास होता, असे ते म्हणाले.

…तरच मुले मोकळपणाने बोलतील : भागवत 

भागवत पुढे म्हणाले, ‘आता काळ आधीसारखा राहिलेला नाही. नवीन पिढी प्रश्न विचारते. त्यांना व्यवस्थित समजावून सांगण्याची गरज भासते. त्यांना वेळ देणे आणि संवाद करण्याची गरज आहे. आता कुटुंबात संवाद होत नाही. कुटुंबात प्रत्येक व्यक्ती त्याचा मोबाईल घेऊन बसलेला असतो. घरात कोणी भेटायला आलं असेल, तरी त्याची कोणालाच माहिती नसते. हे सर्व बदलण्यासाठी भरपूर वेळ जाईल. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा बोलणे होईल. कुटुंबात संवाद झाल्यास मुले मोकळणेपणाने बोलतील, असेही मोहन भागवत यांनी सांगितले. ‘बाळाचं पालनपोषण 12 वर्षांपर्यंत हातात असतं. आपण जे काही सांगतो, त्यावर स्वत: कृती केली पाहिजे. नवीन पिढीला तुम्ही थेट सांगितल्यास स्वीकारणार नाही. कारण ते आधी विश्लेषण करत असतात, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच