AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वणव्यात मित्र गारव्यासारखा…, रशियाचा थेट भारतावर आलेल्या संकटाच्या मुळावरच घाव, पुतिन यांचा मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे, सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद आहे, त्यामुळे भारताच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. यातच आता रशिया पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला आहे, भारतावरील मोठं संकट टळलं आहे.

वणव्यात मित्र गारव्यासारखा..., रशियाचा थेट भारतावर आलेल्या संकटाच्या मुळावरच घाव, पुतिन यांचा मोठा निर्णय
vladimir putinImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 27, 2026 | 9:31 PM
Share

इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या युद्धविराम सुरू आहे. मात्र तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणाव काही कमी झालेला नाहीये. इराणकडून व्यापारी जहाजांसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे अमेरिकेने देखील या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे जागातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसला आहे, कारण भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. भारत केवळ कच्चं तेल आणि एलपीजी गॅससाठीच दुसऱ्या देशांवर अवलंबून नाहीये तर खतांसाठी विशेष: युरियासाठी इतर देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा युरियाचा आयातदार देश आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे आता भारतावर दुप्पट किंमत देऊन खताची आयात करण्याची वेळ आली आहे. मात्र अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा रशिया भारताच्या मदतीला धावून आला आहे.

भारतानं आता खतांच्या खरेदीवर कायम स्वरुपी तोडगा काढण्याचा दिशेनं मोठं पाऊल टाकलं आहे. यामध्ये भारताला रशियाची देखील साथ मिळाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारत आणि रशिया मिळून युरिया उत्पादन संयंत्र स्थापन करणार आहेत. त्यासाठी 2 अब्ज डॉलर एवढा खर्च येणार आहे, याबाबत फायनान्शियल एक्स्प्रेसकडून माहिती देण्यात आली आहे. हा प्रकल्प भारत आणि रशियादरम्यानचा खत निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. या रिपोर्टनुसार हे संयंत्र रशियाची युरालकेम आणि भारतच्या इंडियन पोटॅश, तसेच राष्ट्रीय केमिकल्स अँण्ड फर्टिलायजर्स लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानातून उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प रशियाच्या टोलियाट्टी शहरात उभारणार असल्याची माहिती समोर येत आहे. या कारखान्यातून दर वर्षाला तब्बल 20 लाख टन युरियाची निर्मिती होणार आहे.

दरम्यान दुसरीकडे रशिया भारताला मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा देखील पुरवठा करत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यामुळे भारतात कच्च्या तेलाच्या तुटवडा निर्माण झाला होता, मात्र रशियाकडून भारतानं मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीचं प्रमाण दुप्पट केलं आहे. त्यामुळे भारताचं ऊर्जा संकट देखील टळलं आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...