AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रशियालाच सुनावलं; त्यांच्या ‘या’ वक्तव्यामुळं जग करतय कौतूक…

युक्रेनवरील रशियन हल्ल्याबद्दल बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी कठोर शब्दात त्यांना सुनावले.

परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रशियालाच सुनावलं; त्यांच्या 'या' वक्तव्यामुळं जग करतय कौतूक...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 11, 2022 | 10:24 PM
Share

नवी दिल्लीः रशिया-युक्रेन युद्धाच्या ( War) पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांनी कठोर शब्दात रशियाला सुनावले असल्याने त्यांत्या या वक्तव्याची सध्या जगभरात चर्चा होत आहे. रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) या युद्धाबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट आणि टोकदार भूमिका घेत ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रांचा पुरवठा होत नसल्याने भारत शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यासाठी रशियावर अवलंबून आहे. मात्र हे सांगताना त्यांनी हेही सांगितले की, पाश्चात्य देश पाहत आहेत की आमच्या शेजारी लष्करी हुकूमशाही देश असतानाही त्याला आम्ही मित्रसारखं वागवत आहोत.

सोमवारी युक्रेनवरील रशियन हल्ल्याबद्दल बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी कठोर शब्दात त्यांना सुनावले.

यावेळी ते म्हणाले की, पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे आणि नागरिकांचा जीव घेणे जगाच्या पातळीवर कोणालाही मान्य नाही.

रशिया-युक्रेन संघर्ष असला तरी त्याच्यावर तोडगा निघू शकतो. तो तोडगा संवादाच्या आणि सामोपचाराच्या साहाय्याने सोडवता येतो असंही त्यांनी सांगितले.

त्यामुळे या दोन्हा देशातील असलेला संघर्ष कोणालाही फायदेशीर नाही आणि त्यातून कोणालाच मदतही मिळू शकत नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अशी भूमिका घेतल्याने त्यांचे कौतूक होत आहे.

यापूर्वी ही त्यांनी रशियाकडून करण्यात येत असलेल्या तेल आयातीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले होते की, आपल्या देशात दरडोई उत्पन्न 2 हजार डॉलर आहे.

मात्र इथे लोक महागाईला तोंड देऊन तेल विकत घेऊ शकत नाहीत. त्याबरोबरच आमच्या देशातील लोकांना महागाईचा सामना करावा लागू नये म्हणून जगातील कोणत्याही राष्ट्राबरोबर आम्ही भारतीयांसाठी व्यवहार करायला तयार आहोत आणि ती आमची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?