ओबीसीच्या निर्णयाचं स्वागत, 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास राज्यपालांचा नागरी सत्कार करु : संजय राऊत

वसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईला ओरबडण्याचा केंद्रातील मोदी सरकारकडून सुरु असणारा प्रयत्न, केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प (Budget), गोवा निवडणुकीवर (Goa Election) भाष्य केलं.

ओबीसीच्या निर्णयाचं स्वागत, 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास राज्यपालांचा नागरी सत्कार करु : संजय राऊत
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 11:09 AM

संदीप राजगोळकर,टीव्ही 9 मराठी नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईला ओरबडण्याचा केंद्रातील मोदी सरकारकडून सुरु असणारा प्रयत्न, केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प (Budget), गोवा निवडणुकीवर (Goa Election) भाष्य केलं.राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्याबद्दल संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरीषदेच्या 12 जागांचा निर्णय घेतल्यास त्यांचा नागरी सत्कार करु, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईवर घाला करण्याचा प्रयत्न करण्याचं कारस्थान सुरु असल्याचं संजय राऊत म्हणाले. काँग्रेसच्या काळात जितका मुंबईला ओरबडण्याचा प्रयत्न झाला नाही तितक या सरकारच्या काळात ओरबडण्याचं काम सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले.

पाहा व्हिडीओ:

भाजपच्या काळात मुंबईला ओरबडण्याचा प्रयत्न

संजय राऊत यांनी आम्ही वारंवार सांगत असतो की मुंबईवर घाला घलण्याचा प्रयत्न होतोय. मंबईवर सातत्याने अन्याय केला जातोय. मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईतील भाजपच्या नेत्यांनी याबदल बोलले पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरविण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचं संजय राऊत म्हणाले. काँग्रेसच्या राजवटीत झाले नाही, तेवढे यांच्या काळात मुंबईला ओरबडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईची धुळधाण करणे, प्रकल्प, उद्योग धंदे पळविण्याचा प्रयत्न होतोय. मुंबईला कमी समजणे, महत्व कमी करणे अशा बाबी सुरु आहेत. सव्वा कोटी मुंबई देते, राष्ट्रहितासाठी आम्ही त्याग केला. आमची पाकीटमारी करून आमच्यावर दादागिरी मुंबईवर सातत्याने अन्याय करायचा. मुंबईला शिवसेनेपासून हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मुठभर उद्योगपतींसाठी बजेट

सरकार जे चालवितात त्या उद्योगपतींसाठी हे बजेट आहे. सर्वसामान्यांसाठी करामध्ये कधीच सवलत मिळत नाही.मुठभर उद्योगपतींसाठी हे बजेट असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेच्या उमेदवारांची भाजपला भीती वाटते

शिवसेना म्हणून आम्ही 60 जागा्ंवर युपीमध्ये निवडणूक लढतोय. आमच्या 9 प्रमुख उमेदवारांचं नामांकन रद्द करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयोगानेदेखील आमचे ऐकले नाही. हा लोकशाहीसाठी घातक प्रकार आहे. आमच्या 50 ते 60 उमेदवारामंची त्यांना भीती वाटते. उत्पल पर्रिकरयांची लढाई भाजपविरोधात असून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. आयाराम गयाराम उमदेवारांचा पराभव पणजीच्या जनतेने करावा, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

Pune Election : पुणे महापालिकेची प्रभागरचना जाहीर, सत्तेच्या चाव्या नव्यानं समाविष्ट 34 गावांच्या हाती जाणार?

तिसऱ्या नवऱ्याचा चारित्र्यावर संशय, एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी विवाहितेने दिरापासून झालेल्या मुलीला पेटवलं

Sanjay Raut comment on Governor Bhagatsingh Koshyari and 12 MLC members of Maharashtra Legislature

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.