AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Presidential Election 2022 : राष्ट्रपती हवे असतील शरद पवार आहेत, रबर स्टॅम्प हवा असेल तर अनेक रांगेत; राऊतांचा टोला

Presidential Election 2022 : उद्या दिल्लीत एक बैठक होत आहे. ममता बॅनर्जी यांनी बोलावली आहे. सर्वांना बोलावलं आहे. पवार ही येणार आहेत. आम्हालाही निमंत्रण आहे. या बैठकीला आमचा प्रमुख नेता जाणार आहे.

Presidential Election 2022 : राष्ट्रपती हवे असतील शरद पवार आहेत, रबर स्टॅम्प हवा असेल तर अनेक रांगेत; राऊतांचा टोला
Presidential Election 2022 : राष्ट्रपती हवे असतील शरद पवार आहेत, रबर स्टॅम्प हवा असेल तर अनेक रांगेत; राऊतांचा टोलाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 12:24 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) देशाचे मोठे नेते आहेत. देशातील सर्वात अनुभवी नेते आहेत. या प्रकारच्या निवडणुका येतात तेव्हा आम्ही सर्वजण पवारांचं मार्गदर्शन घेत असतो. देशाला आदर्श राष्ट्रपती हवा असेल, एक उत्तम प्रशासक हवा असले तर सरकारने राष्ट्रपती निवडावा (Presidential Election). रबर स्टॅम्प निवडू नये. पवार हे अनुभवी आहेत. प्रमुख नेते आहेत. संसदीय राजकारणातील अजिंक्य नेते आहे. पवारांच्या नावावर सर्वसंमती होऊ शकते. सरकारचं मन मोठं असेल तर ते राष्ट्रपती निवडतील नाही तर खुजे लोकं निवडतील, असं मी म्हणतोय. अशा गोष्टींसाठी राजकारण्याचं मन मोठं असायला हवं. देशाला राष्ट्रपती हवे असतील तर पवार आहेत. रबर स्टॅम्प हवा असेल तर अनेक लोक रांगेत आहेत, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी लगावला. संजय राऊत यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

उद्या दिल्लीत एक बैठक होत आहे. ममता बॅनर्जी यांनी बोलावली आहे. सर्वांना बोलावलं आहे. पवार ही येणार आहेत. आम्हालाही निमंत्रण आहे. या बैठकीला आमचा प्रमुख नेता जाणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाची रणनीती ठरणार आहे. पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असावेत असं आम्हाला वाटतं. पण पवारांनी या गोष्टींना मान्यता दिली पाहिजे. तरच पावलं पुढे पडू शकतात, असं ते म्हणाले.

ते मोदीही मान्य करतील

शरद पवारांनी विरोधी पक्षांचं नेतृत्व स्वीकारावं असं तुम्ही म्हणाला होता. आता पवारांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असावं असं म्हणत आहात. यापैकी पवार कोणत्या पदासाठी योग्य वाटतात, असं राऊत यांना विचारण्यातालं. त्यावर, दोन्ही पदासाठी पवारांची गरज जास्त आहे. जेव्हा विरोधकांच्या ऐक्याचा प्रश्न होता त्यावेळी कोणी तरी अनुभवी नेत्यांनी धुरा सांभाळावी असं मी म्हणत होतो. पण आता राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. म्हणून आम्हाला पवार राष्ट्रपती व्हावेत असं वाटतं. प्रणव मुखर्जी आणि अब्दुल कलाम यांच्याप्रमाणे राष्ट्रपती हवे असतील तर एकच नाव पुढे येतं ते म्हणजे शरद पवार. हे मोदीही मान्य करतील, असंही ते म्हणाले.

पवारांची इच्छा दिसली नाही

मी शरद पवारांना भेटलो होतो. त्यांच्याशी राष्ट्रपती निवडणुकीविषयी चर्चा केली. त्यावेळी माझं याविषयावर पवारांशी बोलणं झालं. त्यावेळी पवारांची इच्छा दिसली नाही. राष्ट्रपतीपदासाठी आपण इच्छुक आहात का? असं मी त्यांना विचारलं. पण मला त्यांची इच्छा दिसली नाही. आता या विषयावर उद्या चर्चा होईल, असं राऊत म्हणाले.

मोदींच्या निर्णयाचं स्वागत, पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. त्याचं राऊत यांनी स्वागत केलं. मोदींच्या ट्विटचं स्वागत करत आहे. मोदींनी दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. भाजपने हा आकडा पाच कोटी केला होता. पण आता मोदींनी स्वत: 10 लाख नोकऱ्या देणार असल्याचं सांगितलं. त्यांनी 10 लाखावर कायम राहावं. त्याला विरोध करण्याची गरज नाही. कारण हा देशाचा विषय आहे. नोकरीचा विषय आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा