डॉक्टर माझं पोट दुखतय; महिलेचा एक्स रे काढताच डॉक्टरांना बसला प्रचंड धक्का, 17 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या भयानक कांडाचा झाला उलगडा
या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे, एक्स रे काढताच डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. त्यांना देखील विश्वास बसला नाही.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, लखनऊमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची मोठी किंमत एका महिलेला चुकवावी लागली आहे. धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिला पोटाची समस्या घेऊन डॉक्टरांकडे केली. माझं पोट सारखं दुखत आहे. पोटात काहीतरी सतत टोचत राहातं अशी या महिलेनं तक्रार केली. डॉक्टरांनी जेव्हा या महिलेचा एक्स रे काढला तेव्हा डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला.
17 वर्षांपूर्वी झालं होतं ऑपरेशन
जेव्हा या महिलेचा एक्स रे रिपोर्ट समोर आला, तेव्हा त्यामधून एक धक्कादायक बाब समोर आली. या महिलेच्या पोटात कात्री असल्याचं दिसून आलं. या घटनेमुळे या महिलेच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे. या महिलेचं 17 वर्षांपूर्वी ऑपरेशन झालं होतं. मात्र ऑपरेशन करताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कात्री या महिलेच्या पोटातच राहिली होती. त्यामुळे या महिलेचं पोट सारखं दुखायचं, जेव्हा एक्स रे काढण्यात आला, तेव्हा ही घटना समोर आली. महिलेच्या पोटात कात्री असल्याचं समोर आल्यानंतर तीच्या पतीनं संबंधित डॉक्टराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या घटनेबाबत माहिती देताना या महिलेच्या पतीनं सागिंतलं की त्याच्या पत्नीचं 17 वर्षांपूर्वी सिझर झालं आहे. 26 फेब्रुवारी 2008 ला मी माझी पत्नी संध्या पांडेयला डिलेव्हरीसाठी एका रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथे डॉक्टर पुष्पा जायस्वाल यांनी माझ्या पत्नीचं सिझर केलं. मला मुलगा झाला.ऑपरेशन नंतर काही दिवस सर्व ठीक होतं. मात्र त्यानंतर माझ्या पत्नीला अचानक पोट दुखीचा त्रास जाणवू लागला. मी त्यावर अनेक उपचार केले.महागडे औषधं घेतले मात्र तिला काही फरक पडला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला एक्स रे काढण्याचा सल्ला दिला. एक्सरेमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा या महिलेचं ऑपरेशन करून ही कात्री काढण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
