AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या वर्षात सीमा हैदर देणार गुड न्यूज, म्हणाली थोडे वाईट वाटले पण…

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच सीमा हैदर हिने एक गुड न्यूज दिली आहे. सीमा हैदर हिने 2024 मध्ये छोट्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती दिलीय. 2024 हे वर्ष लवकरच आनंद घेऊन येणार असल्याचे सीमाने म्हटले आहे. 

नव्या वर्षात सीमा हैदर देणार गुड न्यूज, म्हणाली थोडे वाईट वाटले पण...
SEEMA HAIDARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 02, 2024 | 3:14 PM
Share

नोएडा : | 1 जानेवारी 2024 : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून आपल्या प्रेमापोटी देशाच्या  सीमा ओलांडून आलेली सीमा हैदर काही ना काही कारणाने दररोज चर्चेत असते. सीमा हैदर भारतात आल्यानंतर तिच्या नावाची एकच चर्चा सुरु झाली होती. ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून तिची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. मात्र, त्या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे सीमा हैदर अनेक वेळा चर्चेत आली आहे. कधी तिच्याबद्दल खळबळजनक दावे केले जातात. तर, कधी ती स्वतः मिडीयाला मुलाखती देऊन प्रसिद्धी मिळवते. आताही ती एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच सीमा हैदर हिने एक गुड न्यूज दिली आहे. सीमा हैदर हिने 2024 मध्ये छोट्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती दिलीय. सीमाच्या गरोदरपणाबाबत याआधीही अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. मात्र, त्या अफवा होत्या. परंतु आता खुद्द सीमा हैदर हिनेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आई होण्याबाबतची गोष्ट सांगितली आहे. एकीकडे तिचा प्रियकर सचिन याचा वाढदिवस आणि दुसरीकडे आई होण्याचे सुख असा दुहेरी आनंद सीमा हैदर घेत आहे.

2024 हे वर्ष लवकरच आनंद घेऊन येणार असल्याचे सीमाने म्हटले आहे. मुलाची संभाव्य जन्मतारीखही तिने सांगितली आहे. पती सचिन आणि त्याच्या कुटुंबियांसमोर मीडियाशी बोलताना सीमा हिने गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सचिनच्या वडिलांनीही सीमा हैदर हिचा हात पाहिल्यानंतर तो मुलगाच असेल असा दावा केला आहे. त्या वृत्तालाही सीमाने दुजोरा दिला.

2024 हे नवे वर्ष नवीन आनंद घेऊन येत आहे. 2023 देखील खूप आनंद घेऊन आला. मला मान्य आहे की त्यावेळी थोडे वाईट वाटले. पण आता सचिनचाही वाढदिवस जवळ येत आहे. त्याचवेळी आणखी दुसरा कोणी सोबत येत असेल तर त्यात वाईट काय? ही चांगलीच गोष्ट आहे.

प्रसूतीच्या संभाव्य तारखेबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली, थोडा वेळ थांबा. होळीच्या आधी काही होऊ शकत नाही. पण, लवकरच आनंदाची बातमी ऐकायला मिळेल असे ती म्हणाली. सीमाने आपल्या चार मुलांनाही पाकिस्तानातून सोबत आणले आहे.

सीमा हैदर हिला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. भारतात आल्यानंतर तिने आपल्या मुलांची नवे बदलली आहेत. मुलगा फरहान अली याचे नाव बदलून राज असे नाव ठेवण्यात आले आहे. ती 8 वर्षांचा आहे. दुसरी सहा वर्षाची मुलगी फरवा हिचे नावही बदलून प्रियंका असे ठेवले आहे. फरीहा बतूल हिचे नाव मुन्नी (4 वर्षे) आणि फरहा बटूलचे हिचे नाव (परी) असे ठेवण्यात आले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.