AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : दुबईच्या राजाला कळलं नितीन गडकरींच महत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणालेले की, तुम्ही गडकरींना …

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रसन्न व्यक्तीमत्वाचे आहेतच. पण देशभरात ते त्यांच्या कामांसाठी ओळखले जातात. हाय वे मॅन ही त्यांची ओळख बनली आहे. नितीन गडकरी यांच्या कामाचा अवाका आणि कार्यतत्परता दुबईच्या राजाच्या नजरेतूनही सुटली नाही.

Nitin Gadkari : दुबईच्या राजाला कळलं नितीन गडकरींच महत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणालेले की, तुम्ही गडकरींना ...
Pm Modi-Nitin Gadkari-Dubai Prince
| Updated on: Sep 17, 2025 | 12:20 PM
Share

केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. एका जनसभेमध्ये गडकरींनी हे वक्तव्य केलं. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम भारतात आले होते, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक खास मागणी केलेली. नितीन गडकरी यांच्यानुसार, दुबईचे प्रिन्स त्यावेळी पीएम मोदींना म्हणालेले की, ‘आमच्यावर एक उपकार करा’

प्रिन्सच म्हणणं ऐकून पंतप्रधान त्यांना म्हणाले की, सांगा तुम्हाला काय पाहिजे?. त्यावेळी दुबईचे प्रिन्स म्हणाले की, गडकरींना सहा महिन्यांसाठी दुबईला एक्सपोर्ट करा. त्यावेळी तिथे उपस्थित लोकही ते ऐकून हसायला लागलेले. नितीन गडकरी यांनी जनसभेत हे वक्तव्य केलं.

दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलेलं

नितीन गडकरी सांगितलं की, त्यावेळी हैदराबाद हाऊसच्या बैठकीत हा किस्सा झालेला. बैठकीला पंतप्रधान मोदी, त्याशिवाय अनेक मंत्री आणि दुबईचा प्रिन्स उपस्थित होते. याच बैठकीत प्रिन्स, पीएम मोदींना ही गोष्ट गमतीने बोलले होते. गडकरी म्हणाले की, नंतर दुबईच्या प्रिन्सनी मला दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं होतं.

गडकरींचा रस्त्यांबाबत दावा काय?

आज देशातील प्रत्येक जिल्ह्यात, गावात रस्ता बनवण्याच्या कामाची चर्चा होते, असा दावा नितीन गडकरी यांनी केला. गडकरी यांनी दावा केला की, त्यांच्या विभागाच्या मेहनतीने आतापर्यंत सात ते नऊ वर्ल्ड रेकॉर्ड बनलेत. गडकरींनी दावा केला की, तुम्ही कुठेही जा, अरुणाचल प्रदेश, मेघालय किंवा त्रिपुरा देशातील प्रत्येक ठिकाणी लोक रस्त्याच्या कामाच कौतुक करताना दिसतील. इतकच काय, प्रत्येक गावात लोक आणि ऑटो ड्रायव्हर बोलताना दिसतात की, रस्त्यांची हालत पहिल्यापेक्षा चांगली आहे. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम 8 एप्रिल 2025 रोजी भारत दौऱ्यार आले होते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.