AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नदी मृत्यू बनून येईल… हे शहर महापुरामुळे होणार उद्ध्वस्त, बाबा वेंगांच्या जल प्रलयाच्या भाकिताने जगाला फुटला घाम !

सप्टेंबर २०२५ मध्ये भारतात सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर, पूर आणि भूस्खलनाची भीती व्यक्त केली जात आहे. वायव्य भारतात या वर्षी आतापर्यंतचा पावसाचा आकडा चिंताजनक आहे.

नदी मृत्यू बनून येईल... हे शहर महापुरामुळे होणार उद्ध्वस्त, बाबा वेंगांच्या जल प्रलयाच्या भाकिताने जगाला फुटला घाम !
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Sep 01, 2025 | 10:58 AM
Share

सप्टेंबर महिना उजाडला तरी अनेक भागात पावसाचं धूमशान सुरू आहे. काही ठिकाणी तर पाऊस दुप्पट वेगाने कोसळतोय, अनेक राज्यांमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे हालत खराब झाली आहे.पवित्र अमरनाथ यात्रेपासून ते वैष्णोदेवी यात्रेपर्यंत, धाराली ते थरली, किश्तवार, मनाली आणि अरुणाचल प्रदेशपर्यंत, पाऊस आणि भूस्खलनामुळे लोक त्रस्त झाले.

याशिवाय, अनेक अतिरेकी घटना घडल्या. याचे ताजे उदाहरण म्हणजे पंजाबमधील गेल्या काही दशकांमधील आलेला सर्वात भयानक पूर, तिथे नद्यांना आलेल्या पुरामुळे कालवे फुटले, हजारो हेक्टर शेतजमीन नष्ट झाली आणि लाखो लोक विस्थापित झाले. विख्यात भविष्यकार बाबा वंगाने 2025 सालासाठी असेच काही विनाशकारी संकेत दिले होते. त्यांनी आत्तापर्यंत केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. त्यामध्ये 9/11चा हल्ला सारख्या घटनांचा समावेश आहे.

बाबा वेंगांचे भाकित आणि सप्टेंबरमध्ये जलप्रलय !

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे. पुढील 16-18 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिलासपूर, शिमला, सिरमौर, सोलन आणि उना जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकूणच, देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यात देखील अशीच परिस्थिती राहील असे संकेत हवामान विभागाने ( आयएमडी) दिले आहेत.

‘सप्टेंबरमध्ये देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.’ असे रविवारी जाहीर झालेल्या मासिक हवामान अंदाजात (monthely weather forecast) , आयएमडीने म्हटले होते. सप्टेंबरमध्ये मासिक सरासरी पाऊस 167.9 मिमी या दीर्घकालीन सरासरीच्या 109 टक्क्यांहून अधिक असण्याची अपेक्षा आहे असेही त्यात नमूद करण्यात आलं होतं. सध्या नद्या दुथडी भरून वाहत आहे, पुरामुळे शहरांमध्येही हाहाकार माजला आहे, त्यामुळे सप्टेंबर 2025 मध्येही मोठी नैसर्गिक आपत्ती येणार का अशी भीती लोकांना वाटत आहे.

कुठे किती पाऊस ?

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, १९८० पासून सप्टेंबर पावसात किरकोळ वाढ झाली आहे, 1986, 1991, 2001, 2004, 2010, 2015 आणि 2019 मध्ये झालेल्या अपुरा पाऊस वगळता ही वाढ दिसून आली. या वर्षी, वायव्य भारतात ऑगस्टमध्ये 265 मिमी पावसाची नोंद झाली, जी 2001 सालानंतर महिन्यातील सर्वाधिक आणि 1901 नंतर 13 व्या क्रमांकाची सर्वाधिक आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, येत्या महिन्यात देशातील बहुतेक भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल. तथापि, उत्तर भारताला ऑगस्ट महिन्यापेक्षा आणखी गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागेल कारण त्यामुळे उत्तराखंडमध्ये भूस्खलन आणि अचानक पूर येऊ शकतात. दुसरीकडे, दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थानमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते. खरं तर, अनेक नद्या उत्तराखंडमधून उगम पावतात. त्यामुळे, अनेक नद्या दुथडी भरून वाहतील आणि याचा परिणाम सखल भागातील शहरे आणि गावांवर होईल.

वायव्य भारतात आतापर्यंतच्या तिन्ही मान्सून महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जूनमध्ये 111 मिमी पाऊस पडला, जो सामान्यपेक्षा 42% जास्त होता, तर जुलैमध्ये 237.4 मिमी पाऊस पडला, जो सामान्यपेक्षा 13% जास्त होता. ऑगस्टमध्ये 265 मिमी पाऊस पडला, जो सामान्य 197.1 मिमी पावसापेक्षा 34.5 % जास्त आहे. एकूणच, वायव्य भारतात 1 जून ते 31 ऑगस्ट दरम्यान 614.2 मिमी पाऊस पडला, जो सामान्य 484.9 मिमी पावसापेक्षा सुमारे 27% जास्त होता.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.