5 वर्षांचा मुलगा बनला दोन मुलांचा बाप, सत्य समोर येताच अख्ख गाव हादरलं, उडाली एकच खळबळ
एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पाच वर्षांचा मुलगा दोन मुलांचा बाप बनला, मात्र सत्य समोर येताच अख्खं गाव हादरलं आहे.

देशामध्ये मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू झाली आहे, एसआयआर सुरू असताना मोठा गोंधळ समोर येत आहे. मध्यप्रदेशपासून ते पश्चिम बंगालपर्यंत एसआयआर सुरू आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामुळे या गावात राहणाऱ्या लोकांना प्रचंड धक्का बसला आहे. पूर्व बर्धमान जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये एका पाच वर्षांच्या मुलाला दोन मुलांचे वडील असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र जेव्हा ही गोष्ट तेथील प्रशासनाला कळाली तेव्हा चांगलाच गोंधळ उडाला या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
ही घटना पूर्व बर्धमान जिल्ह्यातल्या मंगलकोट पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शीतल गावमध्ये घडली आहे. एसआयआर दरम्यान एका कुटुंबाचं मतदार यादीतील नाव चेक करत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाकडून झालेली ही चूक संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला विषय बनली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीनुसार सरोज मांझी यांचं वय 63 वर्ष आहे, तर त्यांचे दोन कथित मुलं लक्ष्मी मांझी यांचं वय 59 आणि सागर मांझी यांचं वय 58 वर्ष एवढं आहे, याचाच अर्थ सरोज मांझी हे केवळ आपल्या दोन्ही मुलांपेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठे आहेत. म्हणजेच ते पाचव्याच वर्षीच दोन मुलाचे वडील बनले आहेत, जे की हे अशक्य आहे. हे प्रकरण शीतल गावामधील बूथ क्रमांक 175 शी संबंधित आहे, एसआयआर अंतर्गत कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन सुरू आहे, याचदरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक म्हणजे हे प्रकरण समोर येताच सरोज मांझी यांच्या दोन कथित मुलांनी धक्कादायक कबुली दिली आहे. आम्ही सरोज मांझी यांचे मुलं नसून, आम्ही त्यांच्या नावाचा वापर केला आहे, परंतु आमचं मुळ गावं हे बांगलादेशात आहे, आम्ही 22 वर्षांपूर्वी आधी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे आलो आणि त्यानंतर कामाच्या शोधात मंगलकोटमधील शीतल गावात आलो अशी कबुली त्यांनी दिली आहे, आणि त्यानंतर आमच्या नावाचा मतदार यादीमध्ये समावेश देखील झाला, असं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
