पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार? आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे संकेत

पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार? आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे संकेत
शक्तिकांत दास

शक्तिकांत दास यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यासाठी करांमध्ये कपात करण्याचे संकेत दिले आहेत. Shaktikant Das indirect taxes for lower fuel rates

Yuvraj Jadhav

|

Feb 22, 2021 | 7:08 PM

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेट्रोल डिझेल दरांविषयी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यासाठी त्यांनी करांमध्ये कपात करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या पेट्रोलच्या दरामध्ये 60 टक्के तर डिझेलवर 54 टक्के करांचा समावेश असतो. केंद्र सरकार इंधन तेलांवर एक्साईज ड्युटी तर राज्य सरकार वॅट वसूल करते. गेल्या काही दिवसांपासून भारतात तेलाच्या किमतीचा भडका उडाला आहे. (Shaktikant Das suggest reducing indirect taxes for lower fuel rates)

महागाईचा फटका सर्व क्षेत्रांना

MPC Minutes च्या कार्यक्रमात बोलताना शक्तिकांत दास यांनी याबाबत संकेत दिले. डिसेंबर महिन्यात ग्राहक दर निर्देशांक 5.5 टक्के राहिल्याची माहिती दिली. क्रूड आईलच्या किमती वाढत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. इंधन दर वाढत असल्यान वेगानं महागाई वाढतेय, असंही ते म्हणाले. वाहतुकीच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रत्येक क्षेत्राला फटक बसत असल्याचं त्यांनी मान्य केले.

केंद्र राज्यांकडून इंधनावर करवसुली

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपात केल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याचं स्पष्ट केले. उत्पादन कमी झाल्यानं तेल आयात करणाऱ्या देशांना त्यांचा फटका बसल्याचंही ते म्हणाले. कोरोनामुळे सरकारसमोरील खर्च वाढला आहे. आर्थिक सुधारणा वेगात करण्यासाठी सरकार गुंतवणूक वाढवत आहे. याशिवाय भांडवली खर्च 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. विविध योजनांवर खर्च करण्यासाठी सरकारला पैशांची गरज असते. त्यामुळे सरकार इंधनावर कर लावतं. केंद्र आणि राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर कर वसूल केला जातो. कोरोनामुळे राज्य सरकाराचंही नियोजन बिघडलंय त्यामुळे तेही कर वसूल करत आहेत.

निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चेन्नईमध्ये बोलताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरुन केंद्र सरकार धर्म संकटात असल्याचं मान्य केले होते. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी मिळून मार्ग काढण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होते.तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी करणार असल्याचं सांगितल्याचं सीतारमण म्हणाल्या. सध्या एका लिटर पेट्रोलच्या किमतीमध्ये 60 टक्के रक्कम कर म्हणून वसूल केली जाते.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला 12 दिवसांनंतर ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Onion Price Today : कांदा सर्वसामान्यांना रडवणार, लासलगावात कांदा 45 रुपयांवर पोहोचला

(Shaktikant Das suggest reducing indirect taxes for lower fuel rates)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें