News9 Global Summit: अबू धाबीमध्ये SHEconomy अजेंडा लॉन्च, समाजाच्या सक्षमीकरणासाठी महिलांची भूमिका महत्वाची, राजदूत संजय सुधीर यांचे विधान
TV9 न्यूज नेटवर्कचे 'न्यूज9 ग्लोबल समिट'चे यूएईतील अबू धाबी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी SHEeconomy अजेंडा देखील सुरू करण्यात आला आहे. यावर युएईमधील भारताचे राजदूत संजय सुधीर यांनी भाष्य केले आहे.

TV9 न्यूज नेटवर्कचे ‘न्यूज9 ग्लोबल समिट’चे यूएईतील अबू धाबी येथे आयोजित करण्यात आले आहे. अमिराती महिला दिनापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या या समिटमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि समावेशकतेवर चर्चा झाली. यावेळी SHEeconomy अजेंडा देखील सुरू करण्यात आला आहे. याद्वारे व्यवसाय, समाज आणि प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी एक रोडमॅप तयार केला जाणार आहे. तसेच महिलांना सर्व आघाड्यांवर मार्गदर्शन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी युएईमधील भारताचे राजदूत संजय सुधीर देखील उपस्थित होते, त्यांनी या खास उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल TV9 चे कौतुक केले.
महिला समाजाच्या सक्षमीकरणाचा केंद्रबिंदू – संजय सुधीर
संजय सुधीर आपल्या भाषणात म्हणाले की, महिला सक्षमीकरण हे समाजाच्या सक्षमीकरणाचे केंद्रबिंदू आहे. यावेळी सुधीर यांनी गिर्यारोहणापासून अंतराळवीर बनण्यापर्यंत सर्व क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीचा उल्लेख केला. तसेच कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू यांच्यासारख्या महिलांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कसे योगदान दिले यावरही त्यांनी भाष्य केले. आज महिला सरकारमध्ये सर्वोच्च पदांवर आहेत आणि त्यांची भूमिका महत्वाची आहे असंही ते म्हणाले.
प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर
संजय सुधीर पुढे बोलताना म्हणाले की, महिलांचा समान आर्थिक सहभाग हा समतावादी समाज निर्माण करण्याचा महत्वाचा मार्ग आहे. यावेळी त्यांनी भारतातील महिला राष्ट्रपती, महिला पंतप्रधान आणि महिला मुख्यमंत्री यांचा उल्लेख करत भारताची प्रगती अधोरेखित केली. तसेच चंद्रयान-मंगळयान अशा ऐतिहासिक अंतराळ मोहिमांचे नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांच्या कामाचेही कौतुक केले. महिला संरक्षण, ऊर्जा आणि विमान वाहतूक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत, तसेच त्या भारत-यूएई पार्टनरशीपचा कणा आहेत असंही सुधीर यांनी म्हटलं आहे.
महिलांचे सक्षमीकरण हे जागतिक आव्हान
सुधीर यांनी पुढे बोलताना, महिला समानता ही केवळ सरकारांची नव्हे तर मीडिया आणि समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. महिलांचे सक्षमीकरण हे राष्ट्रीय नसून जागतिक आव्हान आहे. यावर सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. भारत-यूएई पार्टनरशीप आणखी मजबूत करण्यात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे असंही विधान केलं आहे.
