AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 भारतीय नाविक असलेलं जहाज उडवलं, स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठा तणाव, भीषण मिसाईल हल्ला, जगभरात मोठी खळबळ

स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून मोठी बातमी समोर आली आहे. जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये जहाजाचं प्रचंड नुकसान झालं आहे. हल्ल्यानंतर मोठा स्फोट झाला. या जहाजावर 24 भारतीय नाविक असल्याची माहिती समोर येत आहे.

24 भारतीय नाविक असलेलं जहाज उडवलं, स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठा तणाव, भीषण मिसाईल हल्ला, जगभरात मोठी खळबळ
Attack on shipsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 08, 2026 | 5:16 PM
Share

मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. सोमवारी पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. तर दुसरीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये देखील तणाव चांगलाच वाढला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या जवळ ओमानच्या किनाऱ्यापासून जवळपास 15 नॉटिकल मील दूर अतंरावर एका व्यावसायिक जहाजावर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूमध्ये जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर जहाजाला आग लागली. त्यानंतर जहाजामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. हल्ला झालेल्या या जहाजामध्ये 24 भारतीय नाविक असल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर लगेचच जाहाज पाण्यात बुडून लागल्यानं या जहाजावर असलेल्या क्रू मेंबर्सनी मदतीसाठी डिस्ट्रेस कॉल (SOS) जारी केला. फॉरवर्ड सीमेन यूनियन ऑफ इंडियाकडून या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

या जहाजावर पलाउ देशाचा झेंडा लावलेला होता. समोर आलेल्या माहितीनुसार या जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला आहे. मिसाईल हल्ल्यानंतर जहाज पूर्णपणे डॅमेज झालं आहे, तसेच जहाजावर असलेल्या लाईफ बोटचं देखील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बचाव कार्य हे खूप कठीण बनलं आहे. या घटनेत या जहाजावरील काही क्रू मेंबर्स जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज हा कच्चं तेल आणि एलपीजी गॅस वाहतुकीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून हा मार्ग व्यापारी जहाजांसाठी बंदच आहे, यापूर्वी देखील अनेकदा या मार्गावर जहाजांवर हल्ले करण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा या जहाजावर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला आहे.

इराण, इस्त्रायल युद्ध पुन्हा सुरू

दरम्यान पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच पु्न्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्यानं आता संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे.

Follow Us
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका