AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2025 | 9:36 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील मोगाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर खलिस्तानी समर्थकांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येत आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पंजाबमध्ये आता वातावरण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत, या घटनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे, तसेच त्यांनी यावेळी पंजाब सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘पंजाब राज्याच्या मोगाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची गोळ्या झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. ही खूप दु:खद घटना आहे. पंजाबमधील खलिस्तानी समर्थक लोकांनी एका शिवसैनिकाची खुलेआम हत्या केली. ही घटना पंजाब सरकारच्या जर्जर झालेल्या सरकारी व्यवस्थेला समोर आणते. पंजाबमधील आप सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. या हत्येमधील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे.

या दु:खाच्या प्रसंगी स्व. मंगतराम यांच्या कुटुंबासोबत शिवसेना पूर्ण ताकदीने उभी आहे, शिवसेनेच्या वतीनं मंगतरामजी यांच्या कुटुंबाला तातडीनं 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुत्वच्या प्रति पूर्णपणे समर्पित असलेल्या शिवसेना पक्षाचे कर्मठ जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रभक्त मंगतराम मंगा यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...