साहेब, स्वतंत्रपणे महाराष्ट्र केसरीची नवी ओळख महिला कुस्तिगीरांना मिळावी, शरद पवार यांच्याकडे दिपाली सय्यद यांची विनंती

साताऱ्यात आज महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धा सुरु होतेय. त्या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्रात महिला कुस्ती स्पर्धा भरवण्याची मागणी केलीय.

साहेब, स्वतंत्रपणे महाराष्ट्र केसरीची नवी ओळख महिला कुस्तिगीरांना मिळावी, शरद पवार यांच्याकडे दिपाली सय्यद यांची विनंती
शरद पवार यांची दिपाली सय्यद यांनी भेट घेतलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 1:58 PM

नवी दिल्ली : शिवसेना नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. साताऱ्यात आज महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धा सुरु होतेय. त्या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्रात महिला कुस्ती स्पर्धा भरवण्याची मागणी केलीय. दिपाली सय्यद यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेत महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मागणी केली आहे. आता, शरद पवार दिपाली सय्यद यांच्या मागणीवर काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. दिपाली सय्यद यांनी मार्च महिन्यात सोलापूरमध्ये देखील यासंदर्भात भूमिका मांडली होती. महाराष्ट्रात महिलांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत नाही, ही खंत असल्याचं मत दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलंय. दिपाली सय्यद यांनी शरद पवार यांना एक पत्र लिहिलीय या पत्रात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.

दिपाली भोसले यांचं पत्र

प्रति,

आदरणीय. शरद पवार साहेब,

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद.

विषय :- महिला महाराष्ट्र केसरी आयोजन करीण्या बाबत…

आदरणीय साहेब,

सर्व प्रथम महाराष्ट्र केसरी सुरू करून आपण कुस्तीगीरांना न्याय मिळवून दिलात या करीता आपली खुप खुप आभारी आहे.. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आम्ही आपल्या कार्यात महिला कुस्तीगिरांच्या प्रगती साठी तसेच महिला कुस्तीगिरांच्या शासकीय सेवा अशा अनेक विषयात हातभार लावू इच्छितो, आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे मार्फत विविध राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात, परंतु पुरूष महाराष्ट्र केसरी प्रमाणे स्वतंत्र महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत नाही याची खंत आहे. महाराष्ट्राला पुरुष महाराष्ट्र केसरी विचारले तर जगजाहीर आहे तसेच जर महिला महाराष्ट्र केसरी कोण ? तरी अद्याप माहीती नाही. आदरणीय साहेब आपणांस विनंती आहे कि पुरुष महाराष्ट्र केसरी प्रमाणे स्वतंत्रपणे महिला महाराष्ट्र केसरीची नविन ओळख महिला कुस्तिगीरांना मिळावी हाच एकमेव उद्देश साध्य व्हावा याचसाठी हे प्रयोजन .

आदरणीय पवार साहेब आपण या विषयात मार्गदर्शन करून महिला कुस्तीगीरांना नविन ओळख तुमच्या आशिर्वादाने द्यावी हि नम्र विनंती.

दिपाली भोसले सय्यद.

सोलापूरमध्येही महिलांच्या कुस्तीसंदर्भात दिपाली सय्यद यांनी मांडलेली भूमिका

पुरुष मल्लांच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीबरोबर आता महिला मल्लांच्याही महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी सोलापूर येथील कार्यक्रमात म्हटलं होतं. महिला कुस्तीपटूंना व्यासपीठ मिळण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

इतर बातम्या :

Maharashtra Kesari 2022 : आजपासून महाराष्‍ट्र केसरीला साताऱ्यात सुरुवात, महिला व पुरुषांसाठी स्‍वतंत्र बैठक व्‍यवस्‍था

Maharashtra Kesari यंदा साताऱ्यात, मानाच्या गदेसाठी 5 एप्रिलपासून कुस्त्यांचा थरार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.