राणेप्रकरण राज्याचा विषय, केंद्रीय गृहखात्याला अधिकार नाही: किर्तीकर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 26, 2021 | 6:39 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन करून उचित भूमिका घेऊ असं म्हटलं होतं. त्यावर शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (shivsena leader gajanan kirtikar on narayan rane arrest issue)

राणेप्रकरण राज्याचा विषय, केंद्रीय गृहखात्याला अधिकार नाही: किर्तीकर
गजानन किर्तीकर, शिवसेना खासदार

Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन करून उचित भूमिका घेऊ असं म्हटलं होतं. त्यावर शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या विषयात केंद्राचा काहीच रोल नाही. पोलीस खातं हा राज्याचा विषय आहे. केंद्रीय गृहखात्याला याबाबतचा अधिकार नाही, असं गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केलं. (shivsena leader gajanan kirtikar on narayan rane arrest issue)

केंद्र सरकारने अफगाणिस्तानच्या विषयावर सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर बोलताना गजानन किर्तीकर यांनी राणे प्रकरणावर भाष्य केलं. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानवर प्रतिक्रिया व्यक्त केली. आज परराष्ट्र सचिवांनी याबाबतची माहिती दिली. काबुल एअरपोर्टला दुतावास शिफ्ट केले असून तिथूनच व्हिसा देण्यात येत असल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं. तालिबानींच्या हाती अमेरिकन शस्त्र लागले आहे. त्याचा आपल्याला धोका आहे का हा प्रश्न आहे. हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याने आम्ही केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे, असं किर्तीकर यांनी सांगितलं.

त्यांना नागरिकत्व देणार का?

हिंदू, शीख आणि बौद्ध या अफगाणी नागरिकांना सीएएए अंतर्गत नागरिकत्व देणारा का? असा सवाल केंद्र सरकारला करण्यात आल्याचं ते म्हणाले. अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांना स्वतः आमच्याशी संपर्क साधायला हवा, तर आम्ही त्यांना बाहेर काढू शकतो. एअर पोर्टल पोहचले की भारत सरकार एअर लिफ्ट करते, असे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

वेट अँड वॉचची भूमिका

अफगाणिस्तानातील भारतीय गुंतवणूक भावनात्मक आहे, ती कमर्शिअल नाही. तालिबानसोबतच्या चर्चेबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तिकडे भारतीय नागरिक अडकले आहेत. त्या बाबत तालिबानशी बातचीत होऊ शकते. पण दोन देशातील संवादबाबत तालिबानी भूमिका काय ते पाहावे लागेल असे बैठकीत परराष्ट्र खात्याने सांगितल्याचेही ते म्हणाले. (shivsena leader gajanan kirtikar on narayan rane arrest issue)

संबंधित बातम्या:

Breaking News | आता मृत्यूनंतर क्लास वन अधिकाऱ्याच्या कुटुंबियालाही मिळणार नोकरी, राज्यात अनुकंपा धोरण लागू

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा, महाविकास आघाडीच्या नेते आणि राज्यपालांची भेट रद्द!

शासकीय अधिकाऱ्यांसाठी अनुकंपा नियुक्तीचे धोरण, आशा सेविकांचा मोबदला वाढवला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय

(shivsena leader gajanan kirtikar on narayan rane arrest issue)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI