AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिक्कीममध्ये हाहाकार, सात जणांचा मृत्यू, 150 जण अडकले, सैन्याकडून शोध मोहिम सुरु

सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 150 पेक्षा जास्त जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बचाव पथकाकडून बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरु आहे.

सिक्कीममध्ये हाहाकार, सात जणांचा मृत्यू, 150 जण अडकले, सैन्याकडून शोध मोहिम सुरु
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 04, 2023 | 8:23 PM
Share

गैंगटेक (सिक्कीम) : सिक्कीमध्ये (Sikkim)  मोठं नैसर्गिक संकट कोसळलं आहे. या संकटामुळे हाहाकार उडाला आहे. या संकटाविषयी शब्दांमध्ये सांगता येणार नाही इतकं भयानक हे संकट आहे. आकाशातून बर्फवृष्टी होतेय. प्रचंड हिमवादळ सुरु आहे. असं असताना अचानक हिमस्खलन (Avalanche) झालं. त्यामुळे प्रचंड मोठा हाहाकार उडाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 पेक्षा जास्त जण अडकल्याची माहिती मिळत आहे. भारतीय सैन्य, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरु आहे. एका प्रसिद्ध अशा प्रेक्षणीय स्थळी हिमस्खलन झालंय. या ठिकाणी अनेक प्रवासी अडकले आहेत.

संबंधित घटना ही पूर्व सिक्कीममधील नाथुला येथील त्सोमगो झील परिसरात घडली आहे. या घटनेत आता पर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतकांमध्ये पाच पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. तर एक लहान मुलगा आहे. संबंधित हिमस्खलनाची घटना ही दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी घडली. सिक्कीम पोलीस, सिक्कीमचे ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि अनेक वाहनांचे चालक बचाव कार्यात गुंतले आहेत. त्याचबरोबर भारतीय सैन्याकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु आहे.

संबंधित घटना 15 व्या माईलस्टोनवर घडली आहे. खरंतर फक्त 13 व्या माईलस्टोनपर्यंत जाण्याची परवानगी आहे. पण पर्यटक ऐकत नाहीत. ते जबरदस्ती 15 व्या माईलस्टोनपर्यंत जातात, अशी माहिती चेकपोस्टचे इंस्पेक्टर जनरल सोनम तेनजिंद भूटिया यांनी सांगितलं.

भारत-चीन सीमेवरील नाथुला येथे हिमस्खलन झालंय. सिक्कीममध्ये अजूनही बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे पर्यटकांना 13 व्या माईलस्टोनपर्यंत जाण्याची मर्यादा आखून दिली होती. या दरम्यान अनपेक्षित घटना घडली. तसेच हिमवादळानंतर रस्त्यावर तब्बल 350 जण आणि जवळपास 80 वाहनं फसले आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच