
Foreign Goods : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा सांगितली. भारताला पुढे न्यायचे असेल, देशाचे संरक्षण करायचे असेल, प्रगतीपथावर न्यायाचे असेल तर ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी केवळ सैनिकांवर नाही तर 140 कोटी जनतेची सुद्धा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी भारतीयांनी एक मोठा इशारा दिला. काय आहे तो धोका?
बारीक डोळ्यांचे गणपती बाप्पा
2047 पर्यंत भारताला विकसीत करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था लागलीच तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आपण कोणतेही परदेशी वस्तू खरेदी करू नये असे आवाहन पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी केले. गावा गावातील व्यापाऱ्यांनी शपथ घ्यावी की, परदेशी मालातून किती पण नफा होत असला तरी ते परदेशी वस्तू विकणार नाहीत. आजकाल छोट्या डोळ्यांचे गणपती बाप्पा पण परदेशातून येत आहेत. या गणपतीचे डोळे सुद्धा उघडे नाहीत. होळीचे रंग आणि पिचकारीपर्यंत सर्व वस्तू परदेशातून आयात होत आहे. हा धोका ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले.
अमेरिका-चीनवर साधला निशाणा
गांधीनगर येथील कार्यक्रमात मोदी यांनी नागिरकांना आवाहन केले की, त्यांनी परदेशी वस्तूचा वापर करू नये. त्यांनी नाव न घेता अमेरिका आणि चीनला कडक इशारा दिला. ऑपरेशन सिंदूर हे व्यापक असल्याचा संदेशच जणू त्यांनी दिला. ऑपरेशन सिंदूर ला सैन्यबळासह लोकशक्तीची पण गरज असल्याचे पीएम मोदी म्हणाले. त्यांनी परदेशी माल खरेदी न करण्याचे आवाहन केले.
मेड इन इंडियाचा अभिमान बाळगा
तुमच्याकडे ज्या परदेशी वस्तू आहेत, त्या फेकण्यास आपण सांगत नाही. पण वोकल फॉर लोकल साठी तुम्ही नवीन परदेशी उत्पादने वापरू नका. एक दोन टक्केच अशा वस्तू आहेत, ज्या तुम्हाला बाहेरून आणाव्या लागतील. त्या आपल्याकडे उपलब्ध नसतील. आज भारतात अनेक वस्तू तयार होत आहेत. आपल्याला मेड इन इंडिया ब्रँडचा अभिमान असायला हवा असे आवाहन त्यांनी केले. ऑपरेशन सिंदूरसाठी सैन्यबळासह लोकशक्तीची पण गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.