एक नेता 'टंच माल', तर दुसरा 'आयटम' म्हणतोय, गांधी कुटुंब आता गप्प का? : स्मृती इराणी

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त शेरेबाजीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे

एक नेता 'टंच माल', तर दुसरा 'आयटम' म्हणतोय, गांधी कुटुंब आता गप्प का? : स्मृती इराणी

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त शेरेबाजीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे (Kamal Nath Comment on Imarti Devi). केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी काँग्रेससह गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. कमलनाथ यांच्या शेरेबाजीवर आता गांधी कुटुंब गप्प का? असा सवाल त्यांनी विचारला आहे (Smriti Irani ask why Gandhi family silent on Kamalnath statement).

स्मृती इराणी म्हणाल्या, “काँग्रेसचे नेते नेहमीच महिलांचा सन्मान भंग करतात. आज देशाच्या राजकारणात मध्य प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांची चर्चा होते, तेव्हा एकिकडे महिलांना टंच माल म्हणणारे दिग्विजय सिंह आहेत आणि आता कमलनाथ यांनी भाजपच्या महिला नेत्याला आयटम म्हटलं आहे. आता गांधी कुटुंब गप्प का?”

वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या प्रकरणी खंडवामध्ये बोलताना स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, “मी असं अपमान करण्याच्या उद्देशाने म्हटलो नव्हतो. आयटम हा काही चुकीचा शब्द नाही. मला तर त्यांचं नावही आठवत नव्हतं. आता मी काही बोललं तर तो लगेच अपमान झालाय. शिवराज सिंह चव्हाण केवळ निमित्त शोधून आंदोलनाला बसले आहेत.” कमलनाथ यांनी भाजपकडून विरोध झाल्यानंतर हे स्पष्टीकरण दिलंय. कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांना ‘आयटम’ म्हटलं होतं.

भाजपकडून जोरदार आंदोलन

या प्रकरणी शिवराज सिंह चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक नेते वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत. शिवराज सिंह यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून कमलनाथ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

Hathras | मुलींसह मुलांवरही संस्काराची गरज; स्मृती इराणींचा भाजप नेत्याला घरचा आहेर

ऐन थंडीत दिल्लीचं राजकारण तापलं, निवडणुकीसाठी अमित शाहांपासून सर्वपक्षीय नेत्यांचा दारोदारी प्रचार

जेव्हा स्मृती इराणींसमोरच मोदी म्हणतात ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’

व्हिडीओ पाहा :

Smriti Irani ask why Gandhi family silent on Kamalnath statement

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *