स्मृती इराणी यांचा पत्ता बदलला ! राजधानीमधील तो बंगला सोडला

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी लढविण्यासाठी सातत्याने हुसकविणाऱ्या केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी अखेर ल्युटियन्स दिल्लीला अखेर बाय..बाय केले. त्यांनी त्यांचे सरकारी निवास स्थान आज सोडले.

स्मृती इराणी यांचा पत्ता बदलला ! राजधानीमधील तो बंगला सोडला
smriti irani vacant his banglowImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 9:50 PM

नवी दिल्ली : भाजपा नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी अखेर दिल्लीत आपला सरकारी बंगला रिकामा केला आहे. त्यांचा लोकसभा निवडणूकीत अमेठी लोकसभा मतदार संघातून राहुल गांधी यांचे निकटवर्तीय के.एल.शर्मा यांनी मोठा पराभव केला होता. दिल्लीतील 28, तुघलक रोडवरील ‘क्रिसेंट बंगला’ त्यांना सरकारी निवास स्थान म्हणून मिळाला होता. या बंगल्यावरुन त्यांची नेमप्लेट आज हटविण्यात आली आहे.निवडणूका हरलेल्या सर्व खासदारांना त्यांचे सरकारी बंगले 11 जूलैपर्यंत रिकामे करावेत लागणार होते. त्यामुळे इराणी यांनी देखील त्याचे सरकारी निवासस्थान खाली केले आहे.

5 जू न रोजी राष्ट्रपतींनी जुन्या लोकसभेचा भंग केला होता. त्यानंतर नवीन लोकसभेचे गठन केले आहे. नियमांनूसार निवडणूक हरलेल्या सर्व संसद सदस्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागतो. तसेच मंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागतो.यानंतर हा बंगला निवडणूक जिंकलेल्या नव्या खासदाराला मिळतो. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपाच्या मंत्रिमंडळातील 17 केंद्रीय मंत्र्‍यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.

आतापर्यंत कोणी सोडले बंगले

आतापर्यंत केंद्रीय मंत्रीमंडळातील स्मृती इराणी, आर.के. सिंह, अर्जून मुंडा, महेंद्रनाथ पांडेय,  संजीव बालियान यांनी सरकारी बंगले रिकामे केले आहेत. तर राजीव चंद्रशेखर , कैलास चौधरी, अजय मिश्रा टेनी, व्ही.मुरलीधरन, निशित प्रामाणिक, सुभाष सरकार, साध्वी निरंजन ज्योती, रावसाहेब दानवे, कौशल किशोर, भानूप्रताप वर्मा, कपिल पाटील, भारती पवार, भगवंत खुबा आदींना सरकारी बंगले रिकामे करण्याची नोटीस मिळाली आहे.

इराणी यांचे 10 वर्षांपासूनचे निवासस्थान

नरेंद्र मोदी यांना यंदा 18 व्या लोकसभेत 400 पार करता आलेले नाही. कॉंग्रेसचे उमेदवार के.एल.शर्मा यांनी सुमारे एक लाखांहून अधिक मतांनी स्मृती ईराणी यांचा पराभव केला आहे. यामुळे दिल्लीतील प्रसिद्ध उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या ल्युटियन्स परिसरातील गेल्या दहा वर्षांपासून निवासस्थान असलेला बंगला स्मृती इराणी यांना अखेर सोडावा लागला आहे.

Non Stop LIVE Update
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?.
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?.
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण...
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण....
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो.
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत.
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य.
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा.
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले.
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान.
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?.