AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या परवानगीशिवाय नवऱ्याला कोणतंही औषध देऊ नका; वांगचुक यांच्या पत्नीचा सफदरजंग रुग्णालयाला अल्टिमेटम

sonam wangchuk news : सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना जंतर-मंतरजवळील रुग्णालयात दाखल केलं. परंतु त्यांच्यावर माझ्या परवानगीशिवाय औषधे देऊ नका, अशी पोस्ट त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर केली आहे.

माझ्या परवानगीशिवाय नवऱ्याला कोणतंही औषध देऊ नका; वांगचुक यांच्या पत्नीचा सफदरजंग रुग्णालयाला अल्टिमेटम
| Updated on: Jul 18, 2026 | 12:07 PM
Share

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. 20 दिवसांच्या उपोषणानंतर कोर्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपोषणस्थळी असलेल्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोनम वांगचूक यांच्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. तर रुग्णालयात दाखल केलेल्या सोनम वांगचूक यांच्या पत्नी गितांजली यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. माझ्या परवनागशिवाय त्यांना कोणतंही औषध देऊ नये, अशी मागणी सोनम वांगचूक यांची पत्नी गीतांजली यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून केली आहे.

गीतांजली वांगचूक यांनी म्हटलं की, ‘माझी, कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय सोनम यांना कोणतेही औषध तोंडावाटे आणि शिरेवाटे देऊ नये’. सध्या त्या स्वत: सफदरजंग रुग्णालयात उपस्थित आहेत. त्या वांगचूक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम वांगचूक यांची उपोषणाच्या 21 व्या दिवशी तब्येत बिघडली, असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना शनिवारी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, डॉक्टरांचा सल्ला आणि दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वांगचूक हे नीट पेपरफुटीवरून 28 जूनपासून आंदोलनाला बसले होते.

दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितले की, ‘वांगचूक यांना हायकोर्टाच्या आदेशानुसार रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग 20 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी झालं होतं. त्यामुळे ते अशक्त झाले होते. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची सांगण्यात येत आहे.

अभिजीत दीपकेंची उपोषणाची घोषणा

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शनिवारी आमरण उपोषणाची घोषणा केली. वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दीपकेंनी उपोषणाची घोषणा केली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, ‘मी आजपासून आमरण उपोषण सुरू करत आहे’. सोनम वांगचूक यांच्या मेडिकल टीमने त्यांच्या तब्येतीविषयी महत्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, वांगचूक यांची तब्येत आता स्थिर आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. त्यांचा रक्तदाब आणि साखर कमी झाली आहे. त्यांचा ईसीजी रिपोर्ट देखील नॉर्मल आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा