कोरोनाचं संकट वाढलं, सोनिया गांधी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

कोरोनाचं संकट वाढलं, सोनिया गांधी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
sonia gandhi

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधीही सक्रिय झाल्या आहेत. (Sonia Gandhi To Chair COVID-19 Meet For Congress-Ruled States Today)

भीमराव गवळी

|

Apr 10, 2021 | 10:26 AM

नवी दिल्ली: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधीही सक्रिय झाल्या आहेत. त्या आज काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत. (Sonia Gandhi To Chair COVID-19 Meet For Congress-Ruled States Today)

महाराष्ट्र, ओडिशा, आंध्रप्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, बिहारसहीत अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हॅक्सीनची कमतरता आहे. त्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली असल्याने त्या मुख्यमंत्र्यांशी काय संवाद साधणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत काँग्रेस शासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री सामिल होणार आहेत.

उद्धव ठाकरे सहभागी होणार?

दरम्यान, सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होण्याबाबत कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ते या बैठकीत सहभागी होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागच्यावेळी सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते. त्यामुळे आजच्या बैठकीलाही ते उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

राहुल यांनी काय लिहिलं पत्रात?

राहुल गांधी यांनी काल पंतप्रधा नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं होतं. आपल्या देशातील लोक व्हॅक्सीनच्या तुटवड्यामुळे त्रस्त झाले आहेत. तरीही आम्ही दुसऱ्या देशांना लस निर्यात करत आहोत. 6 कोटींपेक्षा अधिक लस इतर देशांना देण्यात आल्या आहेत. लस निर्यात करण्याचा हा निर्णय सरकारच्या इतर निर्णयाला ओव्हरसाईट करणारा आहे की देशातील लोकांचा जीव धोक्यात घालून निर्यातीच्या नावाखाली पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न आहे? असा सवाल राहुल यांनी केला होता.

राहुल गांधी यांनी ट्विट करूनही सरकारवर टीका केली होतं. कोणताही भेदभाव न करता केंद्राने राज्यांना मदत केली पाहिजे, असं राहुल यांनी म्हटलं आहे. वाढत्या कोरोनाच्या संकटात व्हॅक्सीनची कमतरता ही एक अतिगंभीर समस्या आहे. तो उत्सव नाही. अशावेळी आपल्या देशातील लोकांचा जीव धोक्यात घालून व्हॅक्सीनची निर्यात करणं कितपत योग्य आहे? केंद्राने कोणताही पक्षपात न करता सर्वच राज्यांना कोरोना लसीचा मुबलक साठा दिला पाहिजे. आपल्याला सर्वांना मिळून या संकटाविरुद्ध लढायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

मोदींचा सल्ला

मोदींनीही काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून त्यांना होणाऱ्या आरोपांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिलो हाता. आरोपांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामावर लक्ष द्या, असा सल्ला मोदींनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी तुम्ही चिंता करू नका. रुग्णांची संख्या वाढल्याने आपली कामगिरी खराब होतेय, असा समज करून घेऊ नका. मी आताही तुम्हाला टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला देईन. संक्रमितांची संख्या वाढल्याने आपली कामगिरी खराब आहे, असा विचार करण्याची गरज नाही. तुम्ही टेस्टिंग वाढवली तर तुमची रुग्ण संख्या वाढताना दिसणारच, अशा शब्दात मोदींनी उद्धव ठाकरेंना आश्वस्त केलं होतं. (Sonia Gandhi To Chair COVID-19 Meet For Congress-Ruled States Today)

संबंधित बातम्या:

व्हॅक्सीनची कमतरता ही गंभीर समस्या, हा उत्सव नव्हे; राहुल गांधींचा मोदींना टोला

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या; मोदींचा उद्धव ठाकरेंना दिलासा

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार?

(Sonia Gandhi To Chair COVID-19 Meet For Congress-Ruled States Today)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें