Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची अचानक तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi : सोनिया गांधी 9 डिसेंबर 2025 रोजी 79 वर्षांच्या झाल्या. दीर्घकाळापासून त्या खोकण्याच्या समस्येने त्रस्त होत्या. म्हणून वेळोवेळी त्या चेकअपसाठी येत असतात. खासकरुन दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे त्यांचा त्रास वाढला आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानुसार (PTI) मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. सोनिया गांधी यांची तब्येत मागच्या काही काळापासून ठीक नाहीय. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयात डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना चेस्ट म्हणजे छातीशी संबंधित स्पेशलिस्ट डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अजूनपर्यंत काँग्रेस पक्ष किंवा रुग्णालयाकडून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबद्दल कुठलही हेल्थ बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही.
सोनिया गांधी 9 डिसेंबर 2025 रोजी 79 वर्षांच्या झाल्या. दीर्घकाळापासून त्या खोकण्याच्या समस्येने त्रस्त होत्या. म्हणून वेळोवेळी त्या चेकअपसाठी येत असतात. खासकरुन दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे त्यांचा त्रास वाढला आहे.
पुढील माहिती कधी मिळणार?
सोनिया गांधी मागच्या अनेक वर्षांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करतायत. नियमितपणे त्यांची तापसणी सुरु असते. उपचारासाठी त्या रुग्णालयात जातात. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुढील माहिती मिळेल. सगळ्या परिस्थितीवर लक्ष आहे.
अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्या दिल्लीला निघून आल्या
याआधी 15 जून 2025 रोजी सोनिया गांधी यांना पोटच्या समस्येमुळे सर गंगा राम रुग्णालयाच्या सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्या तीन-चार दिवस होत्या. सोनिया यांची 7 जूनला सुद्धा अचानक तब्येत बिघडलेली. त्यावेळी त्या प्रियंका गांधी यांच्या सिमला येथील निवासस्थानी सुट्टया घालवण्यासाठी गेल्या होत्या. पण अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्या दिल्लीला निघून आल्या. 9 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात मेडिकल चेकअप केलं.
