AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेश्याव्यवसाय करण्यास विधवा महिलेने नकार देताच स्पा मालकाने ओलांडल्या मर्यादा, नेमकं घडलं तरी काय?

25 वर्षीय विधवा महिलेने वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यानंतर स्पा मालकाने असं काय केलं, ज्यामुळे उडाली सर्वत्र खळबळ... मालकाने ओलांडल्या सर्व मर्यादा... तेव्हा नेमकं घडलं तरी काय?

वेश्याव्यवसाय करण्यास विधवा महिलेने नकार देताच स्पा मालकाने ओलांडल्या मर्यादा, नेमकं घडलं तरी काय?
| Updated on: May 20, 2026 | 12:16 PM
Share

सध्या आपल्या आजू-बाजू अशा काही घटना घडत आहेत, ज्यामुळे विश्वास नक्की कोणावर ठेवायचा असा प्रश्न पडतो. आता देखील असंच काही घडलं आहे. 25 वर्षीय विधवा महिलेला नोकरीची गरज असल्यामुळे तिने स्पा मालकावर विश्वास ठेवला आणि कामासाठी सुरुवात केली, सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण नंतर स्पामालकाचा खरा चेहरा समोर आला, त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश येथीस भदोही येथे घडली आहे. नोकरी आमिष देत, स्पा मालकाने विधवा महिलेवर वेश्याव्यवसाय करण्याचा दबाव टाकला. पण जेव्हा महिलेने नकार दिला, तेव्हा त्याने महिलेला मारहाण केली. घडलेल्या घटनेनंतर 25 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

एक महिन्यापासून महिला स्पॉ सेंटरमध्ये करत आहे काम…

या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी शुक्रवारी आरोपी सुजीत कुमार यादव याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 351(3) (गुन्हेगारी धमकी), 352 (शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि 115(2) (इच्छेने दुखापत करणे) अंतर्गत एफआयआर दाखल केला. महिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलीची ओळख जौनपूर निवासी सुजीत कुमार यादव याच्यासोबत आजमगड येथे झाली होती… सुजित याने स्वतःला स्पा सेंटरचा मालक असल्याचं सांगितलं आणि महिलेला नोकरी देण्याचा आरोप केला. महिला नोकरीच्या शोधात होती. त्यामुळे ती देखील सुजीत याच्यासोबत भदोही याठिकाणी आली आणि गेल्या 1 महिन्यापासून स्पा सेंटरमध्ये काम करत होती.

नकार दिल्यानंतर मारहाण…

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सुजीत याने तिच्यावर देखील अन्य महिलांप्रमाणे देह व्यापार करण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात केली, तिने नकार दिल्यानंतर त्याने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तिचे केस ओढले आणि तिला जमीनीवर फेकलं. एवढंच नाही तर, तिला बेदम मारहाण केली. शिवाय वेश्याव्यवसाय न केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे, तर स्थानीक स्तरावर हे प्रकरण चर्चेत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ