रविवार विशेष : नेपाळला भारतात विलीन करण्यास नेहरूंचा नकार, प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्र्यातील महत्त्वाचे खुलासे

या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक बड्या राजकीय नेत्यांविषयी लिहलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही या पुस्तकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

रविवार विशेष : नेपाळला भारतात विलीन करण्यास नेहरूंचा नकार, प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्र्यातील महत्त्वाचे खुलासे

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं ‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ हे पुस्तक चर्चेचा विषय ठरलं आहे. प्रणव मुखर्जी यांच्या या खास पुस्तकात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते इंदिरा गांधी आणि त्याकाळी झालेल्या राजकीय घडामोडींबद्दल धक्कादायक खुलासे आणि दावे करण्यात आले आहेत. या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक बड्या राजकीय नेत्यांविषयी लिहलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही या पुस्तकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. (Sunday Special Nehru refusal to merge Nepal with India important revelations in Pranab Mukherjee autobiography)

नेपाळला भारतामध्ये विलीन करायचं आहे, असा दावा या पुस्तकामध्ये मुखर्जी यांनी केला आहे. परंतु, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी नेपाळला भारतात विलीन करण्याच्या राजा त्रिभुवन बीर विक्रम शहा यांच्या प्रस्तावाला नकार दिला. पण याच जागी जर इंदिरा गांधींनी असत्या तर त्यांनी कधीही ही ऑफर नाकारली नसती असंही मुखर्जींनी पुस्तकात म्हटलं आहे.

‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ या आत्मचरित्राच्या 11 व्या चॅप्टरमध्ये नेहरूंना राजा त्रिभुवन बीर विक्रम शाह यांनी नेपाळचं विलीनीकरण करावं, असा प्रस्ताव दिला होता. पण त्यावेळी नेहरूंनी हा प्रस्ताव फेटाळला. पण नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी ही संधी जाऊ दिली नसती असा उल्लेख मुखर्जींनी पुस्तकामध्ये केला आहे.

‘इंदिरा गांधींनी संधीचा फायदा घेतला असता’

नेहरूंनी नेपाळशी अतिशय मुत्सद्दी पद्धतीनं व्यवहार केला असंही मुखर्जींनी पुस्तकात लिहलं आहे. नेपाळमध्ये राणा राजवटीऐवजी राजशाहीनंतर नेहरूंनी लोकशाही बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेपाळचा राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी नेहरूंना नेपाळ हा भारताचा प्रांत बनवावा असा प्रस्ताव दिला. पण नेहरूंनी ही ऑफर नाकारली. नेपाळ हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि ते तसे राहिले पाहिजे असं नेहरूंचं म्हणणं होतं. पण इंदिरा गांधी याजागी असत्या तर त्यांनी ही ऑफर कधीच नाकारली नसती असा स्पष्ट उल्लेख त्यांनी पत्रामध्ये केला आहे.

‘मोदींनी संसदेत जास्त बोलावं’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी संसदेत जास्त बोललं पाहिजे असं मुखर्जींना वाटायचं. त्यांची अशी इच्छाच होती की, मोदींनी संसदेमध्ये आपल्या कल्पनांचा आणखी प्रसार करण्यासाठी आणि विरोधकांसाठी संसदेत आणखी बोललं पाहिजे. कारण, पंतप्रधानांची उपस्थिती या कामात आणखी बदल करू शकते असं त्यांना वाटायचं.

‘द प्रेसिडेन्शियल इयर्स, 2012-2017’ च्या शेवटच्या संस्मरणामध्ये मुखर्जींनी असंही लिहलं आहे की, पहिल्या कारकीर्दीत मोदींची शैली एकतंत्री- एकाधिकारशाहीची होती. पहिल्या मुदतीच्या काळात मोदी सरकार संसद सुरळीतपणे चालवू शकलं नाही. या आणि सरकारच्या कारभाराचं विच्छेदन करणाऱ्या अनेक गोष्टी प्रणब मुखर्जी यांनी प्रखरपणे लिहल्या आहेत. जवाहरलाल नेहरू असोत किंवा इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी किंवा मनमोहन सिंग असो, या प्रत्येक माजी पंतप्रधानांनी त्यांच्या उपस्थिती सभागृह दणाणून सोडले. असंही त्यांनी आत्मचरित्रामध्ये लिहलं आहे.

खरंतर, मुखर्जींचे मोदींशी अतिशय चांगले संबंध होते पण तरीदेखील मुखर्जींनी मोदींच्या काही निर्णयांवर आत्मचरित्र्याच्या माध्यमातून टीका केली आहे. मुखर्जींनी पुस्तकात माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींबद्दल आपलं मत व्यक्त करताना असंही म्हटलं आहे की, “प्रत्येक पंतप्रधानाची काम करण्याची एक वेगळीच शैली होती. लाल बहादूर शास्त्री यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंपेक्षा वेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. एकाच पक्षातले असूनसुद्धा परराष्ट्र धोरण, सुरक्षा आणि अंतर्गत प्रशासन या मुद्द्यांवर पंतप्रधानांमध्ये मतभिन्नता असू शकते”.

ते नियम बाजूला सारले असते

माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेसाठी पाचारण करण्याचा नियम घालून दिला आहे. पण माझ्या कृतीने या नियमांचं उल्लंघन झालं असतं. शर्मा यांनी 1996मध्ये त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यावर अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार बनविण्यासाठी पाचारण केलं होतं. परंतु, वाजपेयी सरकारला आकड्यांची पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे 2014च्या निवडणुकीपूर्वीच स्थिरता आणि अस्थिरता या दरम्यान तटस्थ निर्णय घेण्याचं मी आधीच ठरवलं होतं, असं सांगतानाच पण या निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळाल्याने आपण भारमुक्त झालो होतो, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच 2014मधील काँग्रेसच्या कामगिरीवर ते अत्यंत निराशही होते.

मनमोहन सिंग आणि पंतप्रधानपद

मुखर्जी यांनी राष्ट्रपती म्हणून डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांसोबत काम केल आहे. या दोन्ही पंतप्रधानांचा या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळा होता. त्यावरही मुखर्जी यांनी पुस्तकात भाष्य केलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांना हे पद मिळालं. काँग्रेस संसदीय दल आणि यूपीएच्या मित्र पक्षांनी सोनिया गांधी यांनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार बनविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, सोनिया गांधी यांनी हा प्रस्ताव नाकारला, असं सांगतानाच सिंग यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (Sunday Special Nehru refusal to merge Nepal with India important revelations in Pranab Mukherjee autobiography)

संबंधित बातम्या:

काँग्रेस भाजपमय होतेय? मुख्यमंत्री, मंत्री चक्क पक्षाच्या कामाला, वाचा सविस्तर

जगण्याच्या अधिकारापेक्षा धर्माचा अधिकार मोठा नाही: मद्रास उच्च न्यायालय

वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प समर्थकांचा धुडगूस, संसेदत घुसण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदी म्हणाले…

(Sunday Special Nehru refusal to merge Nepal with India important revelations in Pranab Mukherjee autobiography)