Supreme Court : दुर्दैवी! आम्ही आधीच्या चुकांपासून काही शिकलो नाही; युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टाला चिंता

युक्रेनमधील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी विविध उपाययोजना राबवा, त्या विद्यार्थ्यांची माहिती राज्य सरकार आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळावी यासाठी हेल्पलाईन सुरु करा, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारची सध्याची मार्गदर्शक तत्वे काय आहेत, याची माहिती न्यायालयाला द्या, असे निर्देश खंडपीठाने केंद्र सरकारला उद्देशून अ‍ॅटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना दिले.

Supreme Court : दुर्दैवी! आम्ही आधीच्या चुकांपासून काही शिकलो नाही; युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टाला चिंता
सुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:17 AM

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यां (Indian Students)च्या सुरक्षेच्या प्रश्न सध्या अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. केंद्रातील सरकारकडून विशेष मोहीम (Special Campaign) राबवून युद्धग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अजून हजारो विद्यार्थी तेथून सुटकेसाठी विनवणी करीत आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने चिंता व्यक्त केली. आम्ही यापूर्वी झालेल्या चुकांपासून धडा घ्यायला हवा होता. मात्र आपण इतिहासातील चुकांपासून काहीच शिकलो नाही ही दुर्दैवी बाब आहे. आम्हाला केंद्र सरकारबाबत काही बोलायचे नाही. मात्र युद्धग्रस्त युक्रेनमधील अडकलेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाटतेय, अशा शब्दांत न्यायालयाने चिंतेचा सूर आळवला. (Supreme Court expresses concern over Indian students in Ukraine)

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी विविध याचिका

रशियाकडून मागील नऊ दिवसांपासून युक्रेनवर शक्तिशाली हल्ले केले जात आहेत. अशा परिस्थितीत भारतातील हजारो विद्यार्थी अजून युक्रेनमध्येच अडकून पडले आहेत. त्यांचे तेथील कडाक्याच्या थंडीत हाल होताहेत, अनेक विद्यार्थी कित्येक किलोमीटरची पायपीट करताहेत. या वस्तुस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान तीव्र चिंता व्यक्त केली. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. त्या याचिकांची गंभीर दखल घेत सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सुनावणी सुरु केली आहे. युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणले जाईपर्यंत त्यांच्या राहण्या-जेवण्याची तसेच वैद्यकीय सुविधेची व्यवस्था करा, अशीही मागणी एका याचिकेतून करण्यात आली आहे.

केंद्र सरकारला हेल्पलाईनसह विविध उपाययोजना राबवण्याचा आदेश

युक्रेनमधील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी विविध उपाययोजना राबवा, त्या विद्यार्थ्यांची माहिती राज्य सरकार आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळावी यासाठी हेल्पलाईन सुरु करा, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारची सध्याची मार्गदर्शक तत्वे काय आहेत, याची माहिती न्यायालयाला द्या, असे निर्देश खंडपीठाने केंद्र सरकारला उद्देशून अ‍ॅटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना दिले.

आतापर्यंत 17 हजार विद्यार्थ्यांना भारतात आणले; केंद्राची प्रशंसा

यावेळी खंडपीठाने युक्रेनमधून अद्याप सुटका करू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. त्यावर केंद्र सरकारने युक्रेनमधून आतापर्यंत 17 हजार विद्यार्थ्यांना मायदेशी भारतात आणले आहे, असे केंद्र सरकारतर्फे अ‍ॅटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले. खंडपीठाने केंद्रा सरकारच्या या कामगिरीची प्रशंसा केली. आम्ही आपल्या कामगिरीवर समाधानी आहोत. मात्र आम्हाला युक्रेनमधील विद्यार्थ्यांची चिंता वाटतेय, असे खंडपीठ म्हणाले. (Supreme Court expresses concern over Indian students in Ukraine)

इतर बातम्या

Video : वाराणसीत दिसला पंतप्रधान मोदींचा खास अंदाज; काशी विश्वनाथाचं दर्शन, ‘डमरू’ही वाजवला

Supreme Court : रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालत असाल तर सावध व्हा… ; सुप्रीम कोर्टाने घेतला हा निर्णय

Non Stop LIVE Update
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.