AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वगुरू झुरळांना घाबरतात… कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चावरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना चिमटा

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

विश्वगुरू झुरळांना घाबरतात... कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चावरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना चिमटा
Sushma Andhare and pm ModiImage Credit source: Google
| Updated on: Jul 20, 2026 | 3:49 PM
Share

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजीत दिपके यांनी संसदवर मोर्चा काढला आहे. आंदोलक संसद भवनच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र पोलिसांकडून या आंदोलनाला विरोध केला जात आहे. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या आंदोलनावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. अंधारे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे – अंधारे

सुषमा अंधारे यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर बोलताना म्हटले की, ‘दिल्लीतील आंदोलनाची बातमी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. आंदोलकांचा प्रश्न चर्चेतून सोडवता आला असता. पण प्रश्न चर्चेच्या पातळीवर सोडवण्याऐवजी सोनम वांगचुक यांना ज्याप्रकारे उचलले त्यातून आंदोलन मोडून काढण्यावर जास्त भर दिल्याचे दिसत आहे. पांढऱ्या चादरी घेऊन सोनम वांगचुक यांना हटवण्याचा प्रयत्न झाला, आपल्याकडे पांढऱ्या सादरी कधी वापरल्या जातात? शेवटच्या क्षणी. लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे. लोकशाहीचा मुडदा उचलायचा आहे अशा पद्धतीने पांढऱ्या चादरी वापरल्या गेल्या.’

विश्वगुरू झुरळांना घाबरतात…

पुढे बोलताना अंधारे यांनी म्हटले की, आज सुद्धा पाण्याचे फवारे, लाठीचार्जसाठी सरकार सज्ज आहे. जे लोक पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे असे म्हणतात ते आपल्याच देशातील नागरिकांशी चर्चा करायला घाबरतात. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही नंतरची गोष्ट पण तुम्ही चर्चा करायला घाबरत आहे. याचा अर्थ विश्वगुरू झुरळांना घाबरतात. हे फार चिंताजनक आहे, या देशात लोकशाही संपलेली आहे.

आम्ही दिपके यांच्या संपर्कात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना अंधारे यांनी सांगितले की, आम्ही सगळे सीजेपी सोबत आहोत,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वारंवार संपर्कात आहेत. अभिजीत दिपके, सोनम वांगचुक यांच्याबरोबरच 18 जणांशी आम्ही संपर्क साधला असून चर्चा केली आहे.

Follow Us
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक पूर्ण
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक, चर्चेत नेमकं काय घडलं?
आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार...
CJP Protest Update | संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद
मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत...
Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी, अपघातांची मालिका कायम
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत...
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत मोठ्या हालचाली
कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
Kolhapur Protest | दिल्ली आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद! कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील...
Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई; आयोजकांवर थेट 3 गुन्हे दाखल!
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत

CJP Protest Delhi : अभिजित दीपकेंच्या दाव्याने एकच खळबळ, वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी…दिल्लीच्या आंदोलनात काय घडलं?.

CJP Protest Delhi : अभिजित दीपकेंच्या दाव्याने एकच खळबळ, वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी…दिल्लीच्या आंदोलनात काय घडलं?

रोहित शर्माने इंग्लंडमध्ये ठोकलेल्या एका शतकाने साधले दोन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे.

रोहित शर्माने इंग्लंडमध्ये ठोकलेल्या एका शतकाने साधले दोन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा.

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा

Arvind Kejriwal : मुलांनी बॅरिकेड्स तोडली, अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारला सूचक शब्दात मोलाचा सल्ला.

Arvind Kejriwal : मुलांनी बॅरिकेड्स तोडली, अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारला सूचक शब्दात मोलाचा सल्ला

CJP Protest : पोलिसांनी ट्रकमधून खेचलं, लाथा घातल्या, आंदोलकांना थेट धक्काबुक्की; दिल्लीत वातावरण चिघळलं!.

CJP Protest : पोलिसांनी ट्रकमधून खेचलं, लाथा घातल्या, आंदोलकांना थेट धक्काबुक्की; दिल्लीत वातावरण चिघळलं!