धक्कादायक! भाजप नेत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, बेडवर आढळला मृतदेह

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. भाजपाचे नेता दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे.

धक्कादायक! भाजप नेत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, बेडवर आढळला मृतदेह
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2025 | 8:46 PM

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. भाजपाचे नेता दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. श्रीजय दासगुप्ता वय (27)असं या मुलाचं नावं आहे. श्रीजय हा दिलीप घोष यांची पत्नी रिंकु मुजुमदार यांच्या पहिल्या पतीचा मुलगा होता. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सात वाजता श्रीजय हा त्याच्या निवासस्थानी मृत अवस्थेमध्ये आढळून आला. या घटनेनंतर त्याला तातडीनं न्यू टाउनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर त्याला तिथून बिधानगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं.

डॉक्टरांनी श्रीजयला तपासून मृत घोषीत केलं, मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, पोस्टमार्टम नंतरच त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे. त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी आरजीकर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीजय हा त्याच्या निवासस्थानी बेडवर मृतावस्थेमध्ये आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच आता त्याच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सावत्र मुलगा

श्रीजय दासगुप्ता हा भाजप नेते दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा होता. दिलीप घोष यांची पत्नी रिंकु मुजुमदार यांच्या पहिल्या पतीचा तो मुलगा होता. त्याचा मृतदेह न्यू टाउन परिसरातील एका फ्लॅटमध्ये संशायस्पदरित्या आढळून आला आहे. श्रीजयचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच याबाबत खुलासा होऊ शकतो, आम्ही घटनेबाबत अधिक तपास करत आहोत, अजूनही श्रीजयच्या कुटुंबाकडून या प्रकरणात कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीजय याचा मृतदेह बेडवर आढळून आला, आम्ही त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान स्थानिक लोकांकडून असाही दावा करण्यात आला आहे की, सोमवारी इथे एक पार्टी देखील झाली होती, या पार्टीशी त्याच्या मृत्यूचं कनेक्शन असू शकतं.