AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ! CM विजय यांची आमदारकी धोक्यात, थेट हायकोर्टाची नोटीस

Tamil Nadu Politics : मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आणि त्यांचे मंत्री आधव अर्जुन यांना 2026 च्या विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकांप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ! CM विजय यांची आमदारकी धोक्यात, थेट हायकोर्टाची नोटीस
tamil nadu cm c joseph vijayImage Credit source: Google
| Updated on: Jul 07, 2026 | 3:49 PM
Share

तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आणि त्यांचे मंत्री आधव अर्जुन यांना 2026 च्या विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकांप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायणन यांच्या खंडपीठाने पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट मतदारसंघातून विजय यांच्या निवडीविरोधात तसेच विल्लीवक्कम मतदारसंघातून आधव अर्जुन यांच्या विजयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करत हा आदेश दिला आहे. याबाबत सविस्

कोणाविरुद्ध किती याचिका?

मुख्यमंत्री विजय आणि टीव्हीकेचे प्रमुख नेते मंत्री आधव अर्जुन यांच्याविरोधात एकूण सहा निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात चार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, यापैकी तीन याचिका पेरंबूर विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या असून त्या एस. दिनेश, आर. डी. शेखर (डीएमके उमेदवार) आणि टी. एन. लक्ष्मी नरसिंहन यांनी दाखल केल्या आहेत. तर तिरुचिरापल्ली ईस्ट मतदारसंघातील विजयाविरोधात एस. इनिगो इररुदयराज यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. तर मंत्री आधव अर्जुन यांच्याविरोधात विल्लीवक्कम विधानसभा मतदारसंघातील विजयाविरोधात आर शिवराज आणि कार्तिक मोहन यांनी याचिका दाखल केल्या आहेत.

याचिकांमधील आरोप काय?

या याचिकांमध्ये निवडणूक प्रचारासाठी मुलांचा वापर करणे आणि निवडणूक खर्चाची माहिती लपविल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, विजय आणि टीव्हीकेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मुलांना प्रचारात सहभागी करून घेतले आणि त्यांचा भावनिक वापर केला. 21 एप्रिल 2026 रोजीच्या एका भाषणाचा उल्लेख करत याचिकेत म्हटले आहे की, विजय यांनी मुलांना लहान मित्रांनो असं म्हणत आई-वडिलांना, आजी-आजोबांना टीव्हीकेच्या ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हाला मतदान करण्यासाठी तसाच हट्ट धरण्याचे आवाहन केले होते.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, हा प्रकार भारत निवडणूक आयोगाने 5 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेल्या त्या निर्देशांचे उल्लंघन आहे, ज्यामध्ये राजकीय पक्षांना प्रचारसभा, रॅली, घोषणाबाजी आणि प्रचार साहित्याच्या वितरणात मुलांचा वापर करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, दोन्ही नेत्यांवर निवडणूक खर्चाची संपूर्ण माहिती न देण्याचाही आरोप करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची चोकशी होणार आहे.

निवडणूक रद्द करण्याचा न्यायालयाकडे अधिकार

दरम्यान, जनप्रतिनिधित्व कायदा, 1951 नुसार कोणत्याही विजयी उमेदवाराच्या निवडणुकीला केवळ उच्च न्यायालयात निवडणूक याचिकेद्वारेच आव्हान देता येते. यात संबंधित उमेदवार दोषी आढळल्यास न्यायालय निवडणूक रद्द करू शकते. न्यायालयाने असा निर्णय दिल्यास मुख्यमंत्री विजय आणि आधव अर्जुन यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा