Tamilnadu election 2021 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींपुढे झुकतात तेव्हा वाईट वाटतं – राहुल गांधी

Tamilnadu election 2021 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींपुढे झुकतात तेव्हा वाईट वाटतं - राहुल गांधी
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची प्रचार रॅली

चेन्नई इथं प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि अण्णाद्रमुकवर जोरदार निशाणा साधला.

सागर जोशी

|

Mar 28, 2021 | 3:16 PM

चेन्नई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे सध्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. चेन्नई इथं प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि अण्णाद्रमुकवर जोरदार निशाणा साधला. “तामिळनाडूचे मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे पाय धरतात, त्यांच्यासमोर झुकतात, ते पाहून वाईट वाटतं”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजप आणि अण्णाद्रमुकवर टीका केलीय.(Congress MP Rahul Gandhi criticizes BJP and AIADMK in Chennai)

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान कंट्रोल करतात आणि मुख्यमंत्री निमूटपणे त्यांचे पाय धरतात, हे मी स्वीकार करु शकत नाही, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. “मी एक फोटो पाहिला आहे. ज्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी अमित शाहांच्या पाया पडत आहेत. हा प्रकार भाजपमध्येच होऊ शकतो, जिथे तुम्हाला भाजप नेत्यांचे पाय धरावे लागतात. जिथे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर सर्वांना झुकावं लागतं”, अशी टीकाही राहुल गांधी यांनी भाजपवर केलीय.

‘तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचाही नाईलाज आहे’

“जेव्हा मी पंतप्रधानांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करताना पाहतो. मुख्यमंत्र्यांनी निमुटपणे त्यांचे पाय धरलेले पाहिलं आहे. मी हा प्रकार स्वीकारला तयार नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनाही अमित शाह यांच्यासमोर झुकायला आवडत नाही. पण त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांचाही नाईलाज आहे”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अण्णाद्रमुकवर टीकास्त्र डागलं आहे. राहुल गांधी यांनी आज चेन्नईमध्ये काँग्रेस उमेदवार हसन हारुन यांच्या समर्थनात प्रचारसभा घेतली. हसन हारुन हे वेलाचेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

संबंधित बातम्या :

Bengal-Assam Election voting : पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान

West Bengal Election 2021 : तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट, TMC नेत्यांचा डावे आणि काँग्रेसवर आरोप

Congress MP Rahul Gandhi criticizes BJP and AIADMK in Chennai

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें