AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदाराचं बेटी बचाव… तिसरं बाळ मुलगी झाल्यास थेट अर्धा लाखाचं बक्षीस; नागरिकांना दिली ऑफर

TDP MP Appala Naidu Announcement: विजयनगरमचे खासदार अप्पाला नायडू यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केलेल्या एका घोषणेची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. काय आहे त्यांची घोषणा ?

खासदाराचं बेटी बचाव... तिसरं बाळ मुलगी झाल्यास थेट अर्धा लाखाचं बक्षीस; नागरिकांना दिली ऑफर
खासदाराची घोषणा चर्चेत
| Updated on: Mar 10, 2025 | 11:52 AM
Share

दक्षिण भारतात गेल्या काही दिवसांपासून लोकसंख्या वाढवण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. याच दरम्यान तेलगु देसम पक्षाच्या (TDP) खासदाराने केलेल्या एका घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिसरी मुलगी झाल्यास 50 हजार रुपये मिळणार.. हो, तुम्ही हे खरंच वाचलं आहे. आंध्र प्रदेशमधील एक खासदार अप्पाला नायडू यांनी केलेल्या घोषणेचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या ऑफरमुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टीडीपीचे विजयनगरमचे खासदार कालिसेट्टी अप्पलनायडू (Kalisetty Appalanaidu) यांनी ही घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये महिलांना तिसरं अपत्य झाल्यास 50 हजार रुपये किंवा गाय देण्यात येईल, अशी ऑफर त्यांनी जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. आपल्या त्यांच्या यशात महिलांचा मोठा वाटा आहे, म्हणूनच ते मुलींसाठी हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले.

मुलगी झाल्यास 50 हजार आणि मुलगा झाला तर…

जर एखाद्या महिलेने तिसरे अपत्य म्हणून मुलीला जन्म दिला तर तिला त्यांच्या पगारातून 50 हजार रुपये दिले जातील आणि जर ते अपत्य मुलगा असेल तर तिला गाय दिली जाईल, असे त्यांनी नमूद केलं. मात्र 50 हजारांची ही रक्कम फिक्स्ड डिपॉझिटच्या रुपात जमा होईल. मुलगी लग्नायोग्य वयात आल्यावर ही रक्कम सुमारे 10 लाखांपर्यंत जाऊ शकते. आणि मुलगा झाला तर ? तिसरं अपत्य हे मुलगा असेल तर त्या कुटुंबाला गाय आणि वासरू देण्यात येईल. म्हणजेच मुलगा असो की मुलगी, दोघांसाठी काही ना काही दिलं जाईल, पण मुलीसाठी 50 हजार रुपयांच्या योजनेने लोकांची मने जिंकली.

आयुष्यात महिलांचे मोठे योगदान

अप्पलनायडू यांच्या सांगण्यानुसरा, त्यांच्या आयुष्यात महिलांचे खूप योगदान आहे. त्यांची आई, पत्नी, बहिणी आणि मुलगी यांनी त्यांना नेहमीच साथ दिली. म्हणूनच जसा जल्लोष मुलगा जन्माला आल्यावर केला जातो, तसंच सेलिब्रेशन मुलगी जन्माल आल्यावरही व्हावं, अशी त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितलं.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.