AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुण तेजपालला हायकोर्टाचा दणका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ठरला दोषी, नेमकं प्रकरण काय?

तरुण तेजपालला हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. त्याला 2013 सालच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे.

तरुण तेजपालला हायकोर्टाचा दणका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ठरला दोषी, नेमकं प्रकरण काय?
| Updated on: Aug 06, 2026 | 11:58 AM
Share

तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपालला मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी 2013 सालच्या प्रकरणात दोषी ठरवले. त्याच्यावर 2013 साली कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता. त्याला हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यानंतर आता त्याला किती शिक्षा द्यायची, यावर पुढील सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्द करून तरुण तेजपाल याला दोषी ठरवलं. गोवा सरकारनं खालच्या न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेविरोधात दाखल केलेल्या अपीलावर हा निकाल देण्यात आलाय. २०१३ मध्ये गोव्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा तेजपालवर आरोप होता. या प्रकरणी गोवा पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून नोव्हेंबर २०१३ मध्ये तेजपाल याला अटक केली होती. त्यानंतर त्याला जुलै २०१४ मध्ये जामीन मिळाला. २०१७ मध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी मे २०२१ मध्ये तेजपाल याची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाने तो निकाल रद्द करून त्याना दोषी ठरवलंय.

काय आहे प्रकरण?

तेहलका मासिकेच्या एका कनिष्ठ महिला सहकाऱ्याने तरुण तेजपाल याच्यावर नोव्हेंबर 2013 साली लैंगिक छळाचा आरोप केला होता. या पीडित महिलेने तेहलकाच्या तत्कालीन मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेजपालने पीडित महिलेला ईमेल पाठवून माफी मागितली होती. ही करिअरमधील लाजीरवाणी चूक होती, असे ईमेलमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर पीडित महिलेने विशाखा कायद्यांतर्गत लैंगिक छळविरोधी सेल स्थापन करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची निस्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी तेजपालने सहा महिन्यांसाठी संपादकाचा राजीनामा दिला होता. तर 22 नोव्हेंबर 2013 रोजी माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गोवा पोलिसांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली होती.

तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 30 नोव्हेंबर 2013 रोजी अटक करण्यात आली. परंतु सुप्रीम कोर्टाने त्याला एका वर्षाच्या जामीन मंजूर केला होता. पुढे सप्टेंबर 2017 साली त्याच्यावर सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा जपण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्यात आली होती. पुढे या प्रकरणी सरकारी पक्षाचे 71 साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेज , ईमेल्सच्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी केली. त्यानंतर सत्र न्यायालयाने 21 मे 2021 रोजी तेजपालला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्ते केले होते. तर हायकोर्टानेही हा निकाल रद्द केला होता.

Follow Us
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह