Tejashwi Yadav : जो घाबरेल त्याला घाबरवलं, जो विकला त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांचा शिंदे गटाला जोरदार टोला

बेरोजगाराची चर्चा सर्वत्र होत आहे, मात्र या भाजपला त्याचे काही देणेघेणे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तेजस्वी यादव दिल्लीत पोहोचले आहेत.

Tejashwi Yadav : जो घाबरेल त्याला घाबरवलं, जो विकला त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांचा शिंदे गटाला जोरदार टोला
जो घाबरेल त्याला घाबरवलं, जो विकला त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांचा शिंदे गटाला जोरदार टोलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 6:44 PM

नवी दिल्ली : बिहारचे (Bihar) उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीत अनेक बड्या नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचीही भेट घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी दिल्लीत पोहोचून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपनं महाराष्ट्र , झारखंड, राज्यात प्रादेशिक पक्षाचं काय केलं बघितलं, जो घाबरेल त्याला त्याला ईडीचा धाक दाखवून घाबरवलं आणि जो खरेदी करता येईल त्याला खरेदी केलं, पण बिहारी विकला जाणारा नाही, असे म्हणत शिंदे गटालाही टोला गवाला आहे. भाजपाच्या विरोधात आम्ही बिहारमधून सुरुवात केली आहे, आता आम्ही आणि नीतीश कुमार एकत्रित आहोत, सगळ्या विरोधी पक्षांनी आता एकत्रित बसण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी विरोधी पक्षांना केलं आहे.

भाजप लबाड बोलणारा पक्ष

त्यांनी भाजपला मोठा लबाड पक्ष म्हटले. भाजपवाले फसव्या गोष्टी करण्यातच मजा घेतात. भाजपला जर बहिराची काळजी असती तर त्याला आजपर्यंत विशेष दर्जा का दिला गेला नाही, असेही त्यांनी विचारलं आहे. तर बेरोजगाराची चर्चा सर्वत्र होत आहे, मात्र या भाजपला त्याचे काही देणेघेणे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तेजस्वी यादव दिल्लीत पोहोचले आहेत.

नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचं काय झालं?

भाजप राज्यात 19 लाख नोकऱ्या देण्याचे केवळे बोलत आहे मात्र त्यांनीही 19 नोकऱ्या दिल्या का? त्याचप्रमाणे ते देशात 2 कोटी नोकऱ्या देण्याचे बोलायचे मात्र ते फक्त 80 लाख नोकऱ्याही देऊ शकले. तेजस्वी यादव यांनी असा आरोपही केला की एडिट केलेला व्हिडिओ चालवला गेला, त्य व्हिडिओला त्याला उत्तर दिलं आहे. गिरीराज सिंह यांनी पंतप्रधान मोदींना नोकऱ्या आणि राज्याला दिलेल्या विशेष पॅकेजबद्दल विचारण्याचे धाडस दाखवायला हवे. भाजप हा लबाडांचा पक्ष आहे, अशी घणाघाती टीका भाजपवर केली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

लवकरच मंत्रिमंडळाचाही विस्तार होणार

10 ऑगस्ट रोजी बिहारमध्ये नवा इतिहास लिहिला गेला. आता नितीश कुमार यांनी राजदच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन केले आहे. नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशी माहितही तेजस्वी यादव यांनी दिली आहे. बिहारमधील सत्तांतर आणि नितीश कुमार यांची चतुराई सध्या देशभरात चर्चेत आहे. नितीश कुमार यांनी  वेळीच राजकारणाच्या वाऱ्याचा रोख ओळखून भाजपची साथ सोडली आहे.

Non Stop LIVE Update
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव.
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला...
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला....
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?.
प्रसिद्ध संगीतकार वी सेल्वागणेश यांना TV9 चा 'नक्षत्र सन्मान'
प्रसिद्ध संगीतकार वी सेल्वागणेश यांना TV9 चा 'नक्षत्र सन्मान'.
'एका व्यक्तीकडून एवढं कसं धाडस होतंय...सरकार..,' काय म्हणाले अजित पवार
'एका व्यक्तीकडून एवढं कसं धाडस होतंय...सरकार..,' काय म्हणाले अजित पवार.
पहिला चित्रपट ते सिनेसृष्टीतील कस होत करीअर? बघा रवीना टंडन Exclusive
पहिला चित्रपट ते सिनेसृष्टीतील कस होत करीअर? बघा रवीना टंडन Exclusive.
... तर अर्धी इंडस्ट्री नष्ट होईल, नेपोटिझमवर रवीना टंडन हिचा खोचक टोला
... तर अर्धी इंडस्ट्री नष्ट होईल, नेपोटिझमवर रवीना टंडन हिचा खोचक टोला.
वडिलांची इच्छा होती मी सैनिक बनाव.., अनुराग ठाकूरांना काय व्हायच होतं?
वडिलांची इच्छा होती मी सैनिक बनाव.., अनुराग ठाकूरांना काय व्हायच होतं?.
विरोधकांच्या पत्रातलं एक वाक्य जरा मनोरंजनासारखे - देवेंद्र फडणवीस
विरोधकांच्या पत्रातलं एक वाक्य जरा मनोरंजनासारखे - देवेंद्र फडणवीस.
युवा बॅडमिंटनपासून ते खास क्रिकेटपटूपर्यंत या खेळाडूंना नक्षत्र सन्मान
युवा बॅडमिंटनपासून ते खास क्रिकेटपटूपर्यंत या खेळाडूंना नक्षत्र सन्मान.