AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atul Save : औरंगाबाद महानगरपालिका आम्हीच जिंकणार, मतदारसंघात दाखल होताच अतुल सावेंचं आव्हान

यावेळी अतुल सावे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेबाबत एक सूचक विधान केलंय. त्यामुळे विरोधकही आता महापालिका निवडणुकीसाठी अलर्ड मोडवर आले आहेत. 

Atul Save : औरंगाबाद महानगरपालिका आम्हीच जिंकणार, मतदारसंघात दाखल होताच अतुल सावेंचं आव्हान
सहकार मंत्री अतुल सावेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 5:41 PM
Share

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलाय. यात भाजपकडून (BJP) 9 मंत्र्यांनी तर एकनाथ शिंदे यांच्याकडून 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. यात मंत्री अतुल सावे (Atul Save) यांचंही नाव होतं. आजचा ते मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच औरंगाबादेत दाखल झाले, त्यामुळे औरंगाबाद शहरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. औरंगाबाद विमानतळापासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठीक ठिकाणी स्वागताच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. आपल्या मतदारसंघातील मंत्री पहिल्यांदाच मतदार संघात येतोय म्हटल्यावर कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. त्याच अनुषंगाने ही सर्व तयारी करण्यात आली होती. यावेळी अतुल सावे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेबाबत एक सूचक विधान केलंय. त्यामुळे विरोधकही आता महापालिका निवडणुकीसाठी अलर्ड मोडवर आले आहेत.

औरंगाबाद महानगरपालिका जिंकणारच

यावेळी बोलताना अतुल सावे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे. पी नड्डा, अमित शाह, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदशर्नात मला कॅबिनेटमध्ये संधी मिळाली. फडणवीसांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्याचा वापर मी जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी करणार, औरंगाबादमध्ये लक्ष घालून विकास करणार आहे.  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, आणि सर्व इतर सहकार्य केलं. 15 ऑगस्टच्या आधी खातेवाटप होईल, येत्या 2 दिवसात दिवसातच हा विषय मार्गी लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर 100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेर झेंडा फडकवू, असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही थेट आव्हान दिलंय.

वॉटरग्रीडचा प्रश्नही आम्ही सोडवणार

तर शपथ घेतल्यानंतर औरंगाबादच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे, पुढील आठवड्यात बैठक घेणार आहे. पाण्याचा प्रश्न सुटला तर नवीन उद्योग येण्यासाठी प्रयत्न करणार, उद्योग आल्यानंतर बेरोजगारी दूर होईल, अशीही माहिती त्यांनी दिलीय. तर वॉटरग्रीडचा प्रश्नही आम्ही सोडवणार, असे आश्वासनही त्यांनी दिलंय. तसेच पालकमंत्रिपद कुणालाही मिळो विकास आम्ही करणारच, जो एकनाथ शिंदें फडणवीसांचा आदेश असेल तो आम्ही मानू, अशी ग्वाही त्यांनी नेतृत्वाबाबत दिली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज अनेक मंत्री आपल्या स्थानिक मतदारसंघात पोहोचत आहेत. त्यांचे स्वागतही मोठ्या थाटामाटात केले जात आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या रॅली निघतानाही दिसून आल्या.  अतुल सावे यांचंही अशाच पद्धतीने आज स्वागत करण्यात आलंय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.