तेलंगणाच्या बाल कलाकाराने अवघ्या 20 मिनटात केला विक्रम, रूबिक क्यूबने साकारला पीएम मोदी यांचा फोटो
अवघ्या सहा वर्षीय विधात याने आपल्या कलेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्या वयात मुळे खेळात रममाण असतात त्या वयात या बालकाने त्याच्याकडील अद्भूत कलेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या बालकाने रुबिक क्युबने अवघ्या २० मिनिटांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र साकारले आहे. यासाठी त्याने ९९ रुबिक क्युबचा वापर केला आहे.

ज्या वयात बहुतेक मुले खेळण्या आणि बागड्यात बिझी असतात, त्या वयात विधात याने त्याच्या अंगभूत अद्भुत प्रतिभेने सर्वांनाच कोड्यात टाकले आहे. तेलंगणाच्या करीमनगर शहरात राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाकडे अशी कला आहे की अनेक प्रशिक्षित व्यावसायिक देखील हे सहज करु शकत नाहीत. या अवघ्या सहा वर्षीय विधात याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ९९ रुबिक्स क्यूब्स वापरून चित्र काढले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने हे चित्र अवघ्या २० मिनिटांत तयार केले.हे चित्र पाहिल्यानंतर, तुम्हालाही आश्चर्य वाटेल की बालवाडीतील एक बालकाकडे इतके चांगले कसब कसे आले.
वयाच्या तीन वर्षापासून प्रयत्न सुरु
सुजाता आणि नितीन रेड्डी यांचा मुलगा विधात याने वयाच्या तीन वर्षापासून रुबिक्स क्यूबशी खेळायला सुरुवात केली. त्याला हा क्यूब सोडवण्यात खूप रस होता. तो हा क्युब सोडवण्यासाठी नियमितपणे सराव करायचा. त्याने याचे ऑनलाइन प्रशिक्षणही घेतले. वयाच्या ६ व्या वर्षी त्याने केवळ रुबिक्स क्यूबचे सर्व रंग एका बाजूला करणे तो शिकलाच परंतू त्या क्यूबने त्याने लोकांची चित्रेही काढायला सुरुवात केली. त्याने रुबिक्स क्यूबने त्याच्या पालकांचे तसेच स्वतःचे फोटो देखील तयार केले आहेत.
मुलाचा अभिमान वाटतो
विधात याच्या कलेमुळे त्याच्या आई-वडिलांना सर्वजण ओळखत आहेत.त्यांना त्याच्या मुलाचा अभिमान वाटत आहे. त्याचा इंटरेस्ट पाहून त्याचे कौशल्य वाढवण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण देखील चालू केले. त्यांनी त्याला आणखीन प्रशिक्षण घेण्यासाठी हैदराबादला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो भविष्यात खूप मोठा कलाकार होऊ शकेल. त्याने त्याच्या रुबिक्स क्यूबचा वापर करून नरेंद्र मोदी आणि पवन कल्याण यांसारख्या सेलिब्रिटींची छायाचित्रं काढली आहेत.
अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला
आतापर्यंत विधात याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याने तेलंगणा क्यूब चॅम्पियनशिप २०२४ आणि डीसी ओपन जुलै २०२४ हैदराबाद सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली प्रतिभा दाखवली आहे. या स्पर्धांमध्ये त्याने त्याच्यापेक्षा मोठ्या स्पर्धकांमध्ये क्यूब्स सोडवून आपली क्षमता दाखवली आहे.
