AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिमाचलमध्ये 1.6°C तापमानात वाढ आणि ढगफुटी, भूस्खलन अशा नैसर्गिक संकटांची मालिका सुरु

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात निसर्गाने हाहाकार माजवला आहे. येथे ढगफुटीने आणि पुराने आपले ६०० हुन अधिक पर्यटक अडकले आहेत.या भागातील पर्वतातील विकास कामे या नैसर्गिक संकटांना आमंत्रण ठरत आहे का ?

हिमाचलमध्ये 1.6°C तापमानात वाढ आणि  ढगफुटी, भूस्खलन अशा नैसर्गिक संकटांची मालिका सुरु
| Updated on: Jul 01, 2025 | 8:40 PM
Share

हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद पडले आहेत. ढगफुटी आणि पुराने येथे देशभरातील पर्यटक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातीलही ६०० पर्यटक येथे अडकून पडले आहेत. गेल्या शतकात हिमाचल प्रदेशचे तापमान सरासरी 1.6 °C तक वाढले आहे. त्यानंतर येथील पर्यावरणात बदल झाला आहे. नैसर्गिक संकटाचे प्रमाण आणि तीव्रता वाढत चालली आहे.

मुख्य समस्या आणि कारण

हिमाचलात अतिवृष्टी आणि ढगफुटी : वाढत्या तापमानामुळे वातावरणात अधिक आद्रता तयार झाली आहे. त्यामुळे अचानक मोठी पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे flash flood आणि भूस्खलन वाढले आहे.

भूस्खलन आणि दरड कोसळणे : डोंगर कापल्याने रस्ते बांधल्याने पर्वतातील स्थिरता भंग झाली आहे. त्यातच जोरदार पर्जन्यवृष्टीने येथील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.

मानवी कारणे : रस्ते, बोगदे, नदी किनाऱ्यावरील संरचना वाढवणे, जल विद्युत योजनामुळे पर्वतावरील असंतुलन वाढले आहे.

प्रभावित क्षेत्र

हिमाचलचा सुमारे ४५ टक्के क्षेत्र भूस्खलनस, पुर आणि हिमस्खलनाची उच्च जोखीमेखाली आहे. त्यामुळे जर जलद उपाय योजले नाहीत तर साल २१०० मध्ये सरासरी तापमानात अतिरिक्त 3-5 °C वाढ होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक संकटाचे तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

उपाय काय आहेत ?

1. विकास कामे

पर्तवावरील खोदकाम आणि बांधकामांवर कठोर नियंत्रण

नदीच्या किनाऱ्यापासून 5-7 m आणि नदीपासून 25 m दुरवरच बांधकाम करावे.

मातीचे परीक्षण आणि भू-तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य करणे.

2. नैसर्गिक संरक्षण

पर्वताती वन संरक्षण, वनीकरण आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देऊन मातीची धूप थांबवावी

जल विद्युत योजना आणि बोगद्यांची निर्मितीच्या जमीनवरील परिणामाचा अभ्यास करावा

3. जागरुकता आणि नियमन

इमारत निर्मिती आणि पर्यावरण नियमांचे सक्तीने पालन

वीज आणि पाण्याचे कनेक्शन परवानगी शिवाय उपलब्ध होऊ नये

मानवकेंद्रीभूत विकास (उदा.पर्यटन, बस प्रवास ) यांचे नियंत्रण करावे

4. स्थानिकांची भागीदारी

पर्वतात राहणाऱ्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांच्या सूचनेनुसार योजना आखाव्यात

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी