AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आणखी एका पक्षाला मोठा झटका;10 खासदार नॉटरिचेबल, बैठकीलाही दांडी, नावांची यादी समोर

गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराला वेग आला आहे, वेगवेगळ्या पक्षांमधून आमदार, खासदार बाहेर पडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसून येत आहेत. आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! आणखी एका पक्षाला मोठा झटका;10 खासदार नॉटरिचेबल, बैठकीलाही दांडी, नावांची यादी समोर
ncpiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 3:20 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराला वेग आला आहे, वेगवेगळ्या पक्षांमधून आमदार, खासदार बाहेर पडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरा मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटाच्या नऊ पैकी तब्बल सहा खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली. या खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक खासदारांची संख्या झाली आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला होता. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधून तब्बल 20 खासदार बाहेर पडले, त्यांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आणि एनसीपीआय पक्षात प्रवेश केलेल्या 20 पैकी 10 खासदारांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारली आहे. यामध्ये खासदार युसूफ पठाण यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. दरम्या यासंदर्भात पक्षाकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलं आहे, काही खासदार हे परदेशात गेले आहेत, तर काही खासदार आपल्या कौटुंबीक जबाबदाऱ्यांमुळे व्यस्त असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान या खासदारांच्या अडचणी देखील आता वाढण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी केल्या प्रकरणात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या खासदारांना नोटीस पाठवली होती, त्यांना उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला होता. हा वेळ गुरुवारी संपला आहे, या खासदारांनी आता लोकसभा अध्यक्षांकडे आणखी दोन आठवड्याचा वेळ मागितला आहे, आता सर्व लक्ष हे लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे लागलं आहे. या खासदारांवर सध्या अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलावर आहे. त्यामुळे आता यांना आणखी दोन आठवड्याचा वेळ मिळणार का? की कारवाई होणार हे पहावं लागणार आहे.

बैठकीला दांडी मारलेल्या खासदारांची नावं

काकोली घोष दस्तीदार, सायोनी घोष, यूसुफ पठाण, माला रॉय, जून मालिया, पार्थ भौमिक, मिताली बाग, कालीपद सोरेन, असीत माल

Follow Us
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....