AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन दिवाळीत काळाचा घाला, बसचा भीषण अपघात,10 प्रवाशांचा मृत्यू , 20 गंभीर जखमी

खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, वीस जण गंभीर जखमी झाले आहेत.

ऐन दिवाळीत काळाचा घाला, बसचा भीषण अपघात,10 प्रवाशांचा मृत्यू , 20 गंभीर जखमी
| Updated on: Oct 29, 2024 | 5:31 PM
Share

राजस्थानच्या सीकरमध्ये आज दुपारी भीषण अपघात झाला आहे.सीकर जिल्ह्याच्या लक्ष्मण गढ परिसरात प्रवाशांनी भरलेली एक प्रायव्हेट बस पुलावर अनियंत्रित झाली आणि त्यानंतर ती पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. या घटनेत बसचा चक्काचूर झाला असून, या बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलि‍सांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सीकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शीने या अपघाताबाबत बोलताना सांगितलं की, बर प्रचंड वेगात होती, अचानक अनियंत्रित झाली आणि पुलाच्या भिंतीला जाऊन धडकली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या अपघातामध्ये दाहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये बसचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघात घडला तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाला आहे, मात्र चालकाचं बसवरील नियंत्रण अचानक कसं सुटलं याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.