AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे तो मुलगा? ज्याने तीन आठवड्यापूर्वीच केली होती भूकंपाची भविष्यवाणी, आता पुढचं भाकीत काय?

Thailand Myanmar Earthquake Prediction : आतापर्यंत नास्त्रेदमस, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या आपण वाचत आलो. त्याची चर्चा ही झाली. पण काल म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या भूकंपाचे पण भाकीत अगोदरच करण्यात आल्याचे समोर आले आहे. कोण आहे तो छोटा भविष्यवेत्ता?

कोण आहे तो मुलगा? ज्याने तीन आठवड्यापूर्वीच केली होती भूकंपाची भविष्यवाणी, आता पुढचं भाकीत काय?
थायलंड-म्यानमारमधील भूकंपाची अगोदरच भविष्यवाणीImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 29, 2025 | 2:47 PM
Share

म्यानमार या शेजारील देशात 7.7 तीव्रतेचा भूकंप आला. त्याने या देशात मोठी जीवित आणि संपत्तीची हानी केली. त्यानंतर या मुलाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. एका वृत्तातील दाव्यानुसार, या मुलाने तीन आठवड्यांपूर्वीच या दोन देशांमध्ये भूकंप येण्याचा इशारा दिला होता. अभिज्ञ आनंद असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या युट्यूब चॅनलवर 1 मार्च रोजी भूकंपाचा दावा करणारा व्हिडिओ त्याने अपलोड केला आहे. या भाकि‍तानंतर अवघ्या काही दिवसात त्याची भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली.

थायलंड आणि म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप आला .बँकॉकमध्ये ताज्या आकडेवारीनुसार तीन लोक ठार झाले. तर म्यानमारमध्ये नैसर्गिक संकटामुळे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. थायलंड आणि म्यानमारमध्ये शुक्रवारी दुपारी 7.7 तीव्रतेचा भूकंप आला. बँकॉकमधील एक बांधकाम होत असलेली बहुमजली इमारात कोसळली. तिच्या मलब्याखाली कमीत कमी तीन लोक ठार झाल्याचे समोर येत आहे. तर इतर जण दबल्याची शंका आहे. तर 90 जण बेपत्ता आहे. थायलंडचे संरक्षण मंत्री फुमथाम वेचायाचाई यांनी ही माहिती दिली.

1 मार्च रोजीच भूकंपाचे भाकीत

या भूकंपाविषयी अभिज्ञ आनंद या मुलाने 3 आठवड्यांपूर्वीच भाकीत केल्याचे समोर आले होते. अभिज्ञच्या युट्यूब चॅनलवर 1 मार्च रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. त्यात याविषयीचा दावा करण्यात आला होता. पुढील काही आठवड्यात अथवा या वर्षाच्या मध्यात मोठा भूकंप येणार असल्याचा आणि त्यात मोठे नुकसान होण्याचा त्याचा दावा होता.

कोण आहे अभिज्ञ आनंद?

अभिज्ञ 20 वर्षांचा तरुण आहे आणि 11 व्या वर्षांपासून ज्योतिष विद्येचा अभ्यासक आहे. तो मूळचा कर्नाटकातील म्हैसूर येथील रहिवाशी आहे. तो सर्वात कमी वयाचा ज्योतिषी आहे. त्याने अवघ्या 7 व्या वर्षी भगवत गीता मुखोद्गत केली आहे. तो लहानपणापासून संस्कृत भाषा शिकत आहे. त्याच्या आईने त्याला नेहमी साथ दिली. अभिज्ञ याचे युट्यूबवर चॅनल आहे. त्यावर त्याने अनेक व्हिडिओज अपलोड केले आहेत. त्यात त्याने अनेकदा भविष्यवाण्या सुद्धा केल्या आहेत.

भूकंपाची भविष्यवाणी

या भूकंपाविषयी त्याने 3 आठवड्यांपूर्वीच भाकीत केले होते. याशिवाय त्याने त्या तारखेसह नकाशावर भूकंपाचे भाकीत केले होते. टीव्ही 9 सोबत एका खास चर्चेत त्याने ज्योतिषी आणि संस्कृताचा मार्ग निवडण्यासाठी भगवान कृष्णाने मार्गदर्शन केल्याचे सांगितले. प्राजना ज्योतिष या स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून तो 1200 मुलं आणि 150 संशोधकांना शिकवतो. या संस्थेची सुरुवात त्याने 2018 मध्ये केली होती. अभिज्ञ याने केवळ 12 व्या वर्षी वास्तू शास्त्र या विषयात पदवी मिळवली आहे.

यापूर्वी त्याने 2020 मध्ये कोविड, 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, 2023 मधील हमासचा दहशतवादी हल्ला, 2024 मध्ये बांगलादेशातील सत्ता पालटाविषयी अगोदरच भाकीत केले होते. तर आता त्याच्या पुढील भाकीताविषयी पण चर्चा आहे. अनेक जण त्याच्या चॅनलला भेट देत आहेत.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.