AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay CM Oath: शपथविधी सोहळ्यात त्रिशाने विजय यांच्या कुटुंबीयांची घेतली गळाभेट; आई म्हणाली “मदर्स डेची सर्वोत्तम भेट..”

थलपती विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. मदर्स डेनिमित्त मुलाने मला सर्वोत्तम भेट दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तर अभिनेत्री त्रिशासुद्धा शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती.

Thalapathy Vijay CM Oath: शपथविधी सोहळ्यात त्रिशाने विजय यांच्या कुटुंबीयांची घेतली गळाभेट; आई म्हणाली मदर्स डेची सर्वोत्तम भेट..
थलपती विजय आणि त्रिशा कृष्णनImage Credit source: Instagram
| Updated on: May 10, 2026 | 11:59 AM
Share

तमिळगा वेत्री कझगमचे (टीव्हीके) प्रमुख आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सी. जोसेफ विजय यांनी आज (रविवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसह राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते. तर अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीने यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं. निळ्या रंगाची साडी नेसून अत्यंत पारंपरिक पोशाखात त्रिशा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती. कार्यक्रमस्थळी त्रिशा येताच सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. गेल्या काही काळापासून थलपती विजय यांच्यासोबत त्रिशाचं नाव जोडलं जात आहे. त्यामुळे या शपथविधी सोहळ्यातील तिच्या उपस्थितीची विशेष चर्चा रंगली. त्रिशाने यावेळी विजय यांची आई आणि बहिणीचीही गळाभेट घेतली.

शपथविधी सोहळ्यापूर्वी विजय यांच्या आईने अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. “आज मी फार खुश आहे. आज मदर्स डे निमित्त माझ्या मुलाने मुख्यमंत्री होऊन मला खूप मोठी भेट दिली आहे. ही फक्त माझ्यासाठी तर संपूर्ण तमिळनाडूच्या जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.

अभिनेत्री सनम शेट्टीनेही आनंद व्यक्त केला आहे. “आज मी इथे आपल्या सर्वांचे प्रिय थलपती विजय यांच्यासाठी इथे उभी आहे. आज मदर्स डे असून तमिळनाडूचे सुपुत्र, आपल्या जनतेचे मुख्यमंत्री थलपती विजय हे पदभार स्वीकारत आहेत. विजय सरांचं नाव न ऐकलेली अशी कोणती व्यक्ती नाही. आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतोय की आमच्या विजय सरांच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. गेली दोन वर्षे अत्यंत कठीण होती”, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच त्रिशा आणि विजय यांचं नातं सतत चर्चेत आहे. विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत त्यात विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्रिशा आणि विजय यांच्या नातेसंबंधाच्या अधिक चर्चा होऊ लागल्या आहेत. तमिळनाडूमधील निवडणुका, त्यानंतर निकाल आणि आता शपथविधी सोहळा.. या संपूर्ण प्रवासात त्रिशा सतत विजय यांच्या पाठिशी असल्याचं दिसून आलं. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सकाळी तिने तिरुपती बालाजी यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळी ती विजय यांच्या निवासस्थानी पोहोचली होती.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?