AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शहर हादरलं, न्यायाधीशाने आपलं आयुष्य संपवलं, मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, न्यायाधीशाने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून अस्पष्ट आहे. घटनेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मोठी बातमी! शहर हादरलं, न्यायाधीशाने आपलं आयुष्य संपवलं, मोठी खळबळ
अमन शर्मा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 02, 2026 | 9:23 PM
Share

दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सफदरजंग परिसरात एका जजने आत्महत्या केली आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार अमन कुमार शर्मा असं या जजचं नाव आहे. त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही घटना दक्षिण दिल्लीच्या ग्रीन पार्क परिसरात घडल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीच्या ग्रीन पार्क परिसरात ही घटना घडली आहे. अमन कुमार शर्मा यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. हा परिसर दिल्लीच्या सफदरजंग एनक्लेव्ह पोलीस ठाण्यातंर्गत येतो. दरम्यान घटना समोर येताच तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमन कुमार शर्मा वय 30 वर्ष, राहणार यू-4ए, पहिला मजला ग्रीन पार्क मेन असं मृत व्यक्तीचं नाव आहे. अमन कुमार शर्मा हे कडकडडूमा कोर्टमध्ये जज होते, अशी माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमन कुमार शर्मा यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे मेहुणे शिवम यांनी पोलिसांना दिली. दरम्यान अमन कुमार शर्मा यांनी आत्महत्या केली की काही घात पात आहे? या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र प्राथमिक तपासामध्ये हा घात पात आहे, अशा स्वरुपाचे कोणतेही पुरावे पोलिसांना घटनास्थळी आढळून आलेले नाहीयेत.घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी अमन कुमार यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला आहे.पोस्ट मार्टमचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप पोलिसांना कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये, सध्या पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबाची आणि शेजाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!