AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलंगणाचे होणारे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची लव्ह स्टोरी, काँग्रेस नेत्याच्या भाचीच्या पडले प्रेमात

रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाच्या राजकीय इतिहासाना नवा अध्याय लिहिला आहे. काँग्रेससाठी त्यांनी विजय खेचून आणला आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली आहे. त्यांची लव्हस्टोरी देखील तितकीच रंजक आहे.

तेलंगणाचे होणारे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची लव्ह स्टोरी, काँग्रेस नेत्याच्या भाचीच्या पडले प्रेमात
congress
| Updated on: Dec 06, 2023 | 9:09 PM
Share

Revanth reddy love story : तेलंगणात काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांचा 7 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री होतील. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचा प्रमुख चेहरा होते. तेलंगणात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. केसीआर विरोधात त्यांनी विजय खेचून आणला. 2021 मध्ये काँग्रेसने रेड्डी यांच्याकडे राज्याची कमान सोपवली होती. तेव्हापासून तो सतत मेहनत घेत होते.

प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी खूप मेहनत घेतली. काँग्रेस हायकमांडने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत राज्याची धुरा त्यांच्याकडे सोपवण्याची घोषणा केली. रेवंत रेड्डी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री असतील. तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून केसीआर 10 वर्षे सत्तेत होते.

रेवंत रेड्डी यांचा उद्या शपथविधी

केसीआर यांनी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि पुन्हा मुख्यमंत्री बनले. यावेळी हॅट्ट्रिक करण्याचे त्यांचे स्वप्न होते पण काँग्रेसने त्यांचे स्वप्न भंगले. रेवंत रेड्डी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अशा परिस्थितीत, शपथ घेण्यापूर्वी, तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची प्रेमकहाणी काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रेवंत रेड्डी यांची प्रेमकहाणी खूपच रंजक

रेवंत रेड्डी यांची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. नागार्जुनसागर धरणाजवळ बोट राईड करताना रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांची भाची गीता यांच्या प्रेमात पडले होते. गीताला मिळवण्यासाठी रेवंत यांना खूप प्रयत्न करावे लागले कारण त्यावेळी रेवंत हे उस्मानिया विद्यापीठातून फाइन आर्ट्समध्ये पदवी घेत होते.

रेवंतल यांना गीतासोबत लग्न करायचे होते पण गीताच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. मात्र, नंतर मान्यता मिळाली. 1992 मध्ये रेवंत यांनी गीतासोबत लग्न केले. ७ मे १९९२ रोजी दोघांचे लग्न झाले. यानंतर रेड्डी यांनी राजकारणात प्रवेश केला. रेवंत आणि गीता यांना निमिषा ही मुलगी आहे. निमिषाचा विवाह रेड्डी मोटर्सचे मालक जी वेंकट रेड्डी यांचा मुलगा सत्यनारायण रेड्डी यांच्याशी २०१५ मध्ये झालाय.

रेवंत रेड्डी यांचा राजकीय प्रवास

आंध्र प्रदेशातील महबूबनगर येथे ८ नोव्हेंबर १९६९ रोजी जन्मलेल्या रेवंत रेड्डी यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी अभाविपमधून राजकारणाला सुरुवात केली. नंतर ते चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात (टीडीपी) सामील झाले. 2009 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक जिंकली. 2014 मध्ये ते टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले.

2021 मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

तीन वर्षांनंतर म्हणजेच 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेलंगणात पुढील वर्षी म्हणजे २०१८ मध्ये विधानसभा निवडणुका होत्या. या निवडणुकीत त्यांचा टीआरएस उमेदवाराकडून पराभव झाला. 2019 मध्ये काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरीतून तिकीट दिले. ही निवडणूक जिंकून ते खासदार झाले. 2021 मध्ये काँग्रेसने त्यांना मोठी जबाबदारी दिली आणि त्यांना तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.