आता तशी दाढी राहिली नाही… राहुल गांधी यांचा नवा लूक पाहिलाय काय?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली होती. कन्याकुमारीहून ही यात्रा सुरू झाली होती. 12 राज्यांमधून ही यात्रा गेली होती. जम्मू-काश्मीरमध्ये या यात्रेचा समारोप झाला.

आता तशी दाढी राहिली नाही... राहुल गांधी यांचा नवा लूक पाहिलाय काय?
rahul gandhi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 9:38 AM

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांचा लूक पूर्णपणे बदलला आहे. भारत जोडो यात्रेत असताना राहुल गांधी यांनी दाढी वाढवली होती. राहुल गांधी यांनी भली मोठी दाढी वाढवल्यानंतर त्यांच्या दाढीची चर्चा सुरू झाली होती. राहुल गांधी दाढी कधी कापणार अशी चर्चा सुरू होती. तर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या दाढीची तुलना सद्दाम हुसैन यांच्या दाढीशी केली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या दाढीची पुन्हा चर्चा रंगली होती. पण आता राहुल गांधी यांचा नाव लूक समोर आला आहे. त्यात त्यांनी दाढी पूर्णपणे काढली नसली तरी दाढी सेट केलेली आहे. तसेच त्यांनी सूटबूट परिधान केलेला आहे. त्यामुळे राहुल गांधी अत्यंत वेगळे दिसत आहेत.

राहुल गांधी सात दिवसाच्या ब्रिटेनच्या दौऱ्यावर आहेत. ते केंब्रिज विद्यापीठात लेक्चर देणार आहेत. त्याआधीच राहुल गांधी यांचा फोटो समोर आला आहे. या फोटोत राहुल गांधी यांनी दाढी कापलेली दिसत आहे. पण पूर्णपणे कापलेली नाही. त्यांनी कोट आणि टाय परिधान केला आहे. तसेच त्यावर जॅकेट घातल्याचंही दिसत आहे. राहुल गांधी यांचा हा लूक एकदम हटके आहे.

हे सुद्धा वाचा

सात दिवस ब्रिटनमध्ये

या सात दिवसाच्या ब्रिटन दौऱ्यात राहुल गांधी सुरुवातीला केंब्रिज विद्यापीठात लेक्चर देतील. केंब्रिजमधील बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांना ते लर्गिनंग टू लिसन इन द 21 वी सेंच्युरी या विषयावर लेक्चर देणार आहेत. या दौऱ्यात ते बिग डेटा अँड डेमोक्रसी आणि इंडिया चायना रिलेशन या विषयावरही बोलणार आहे. तसेच ते अनिवासी भारतीयांना संबोधित करणार आहेत.

केंब्रिजचं ट्विट

राहुल गांधी यांच्या या दौऱ्याबाबत केंब्रिजच्या जेबीएसनेही ट्विट केलं आहे. भारताचे प्रमुख विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या स्वागताचा आम्हाला आनंद होत आहे. ते आज विद्यापीठात महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

rahul gandhi

rahul gandhi

चार हजार किलोमीटर पायपीट

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली होती. कन्याकुमारीहून ही यात्रा सुरू झाली होती. 12 राज्यांमधून ही यात्रा गेली होती. जम्मू-काश्मीरमध्ये या यात्रेचा समारोप झाला. या साडेचार महिन्याच्या काळात राहुल गांधी तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंत पायी चालले. या काळात त्यांनी दाढी वाढवली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या लूकची जोरदार चर्चा सुरू होती.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.