भारतातील असं एकमेक गाव जिथे लोक फक्त शिट्टीच्या भाषेतच बोलतात, प्रत्येकासाठी आहे एक खास शिट्टी
तुम्ही कधी अशा गावाबद्दल ऐकलं आहे का? जीथे लोक एकमेकांना त्यांच्या नावानं नाही तर फक्त शिट्टी वाजून बोलावतात. तुम्ही बरोबर ऐकलं आहे, भारतात असं एकमेव गाव आहे, ज्या गावाची भाषा सर्वांपेक्षा वेगळी आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

तुम्ही कधी अशा गावाबद्दल ऐकलं आहे का? जीथे लोक एकमेकांना त्यांच्या नावानं नाही तर फक्त शिट्टी वाजून बोलावतात. तुम्ही बरोबर ऐकलं आहे, भारतात असं एकमेव गाव आहे, ज्या गावाची भाषा सर्वांपेक्षा वेगळी आहे, हे लोक फक्त शिट्टीमध्ये संवाद साधतात, या भाषेला शिट्टीची भाषा म्हणून ओळखलं जातं.
कुठे आहे गाव?
हे गाव मेघालय राज्यामध्ये आहे, कॅन्थोंग असं या गावाचं नाव आहे, या गावात राहणारे लोक शेकडो वर्षांपासून एकमेकांसोबत संवाद साधताना फक्त शिट्टीचाच वापर करतात. इथे प्रत्येकाच्या नावासाठी एक वेगळी शिट्टी आहे. जेव्हा तो व्यक्ती ती शिट्टी ऐकतो, तेव्हा तो समजून जातो की आपल्याला बोलावले आहे, किंवा समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलत आहे. येथील लोक शेतात काम करत असले किंवा जंगलामध्ये काम करत असतील किंवा कुठेही काम करत असतील तर ते सर्वजण एकमेकांना शिट्टी वाजूनच बोलावतात. या विचित्र वाटणाऱ्या परंपरेला कांगथोंन गावाच्या लोकांनी देश आणि विदेशात लोकप्रिय बनवलं आहे, ही प्रथा आता एवढी लोकप्रिय झाली आहे की, या गावाला व्हिसलिंग व्हिलेज अशी नवी ओळख मिळाली आहे.
भाषेचा इतिहास
कॅन्थोंग गाव हे घनदाट जंगालानं वेढलेलं आहे. या गावाभोवती चारही बाजूनं उंच -उंच पर्वत आहेत. यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्याला आवाज देतात तेव्हा आवाजाची घनता कमी होते, मात्र शिट्टी त्या व्यक्तीला स्पष्ट पणे ऐकायला जाते. त्यामुळे शिट्टी वाजूनच एकमेकांसोबत संवाद साधण्याची कला या लोकांनी आत्मसात केली आणि त्यातून स्वतंत्र शिट्टीची भाषा तयार झाली. या गावात ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, आणि आजही हीच भाषा वापरली जाते.
मेघालयामधील या गावाची भौगोलिक स्थितीच अशी आहे की, जेव्हा तुम्ही सामान्य भाषेत एकमेकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमच्या आवाजामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात, त्यामुळे तुम्ही इतरांशी नीट संवाद साधू शकत नाहीत, त्यामुळे येथील लोकांनी शिट्टीलाच संवादाचं साधन बनवलं आहे, यातूनच शिट्टीच्या अनोख्या भाषेचा विकास झाला. शिट्टीमुळे हे लोक कितीही दूरवरच्या लोकाशी सहज संवाद साधू शकतात.
हे गाव पर्यटनाचं एक प्रमुख केंद्र बनलं आहे, दरवर्षी हजारो लोक या गावाला भेट देतात. येथील भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
