मागे ट्रक पलटी, ड्रायव्हर साहेबांचा आराम आणि फोनवर गप्पागोष्टी!

काही व्हारयल गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या चेहऱ्यावर आपोआपच हास्याची एक रेष उमटवतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:04 PM, 4 Mar 2021
मागे ट्रक पलटी, ड्रायव्हर साहेबांचा आराम आणि फोनवर गप्पागोष्टी!

मुंबई : समाज माध्यम हे असं साधन आहे की, ज्याचा पिटारा अनेक मजेदार किस्स्यांनी भरुन वाहत असतो. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात अनेक फोटो आणि व्हिडीओंचाही समावेश असतो. अशी एखादी व्हायरल गोष्ट पाहून तुम्ही हैराण होता. कधी एखादी शिवीही हासडता. पण काही व्हारयल गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या चेहऱ्यावर आपोआपच हास्याची एक रेष उमटवतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो कुण्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचा नाही तर एका साध्या ट्रक ड्रायव्हरचा आहे.(Photo of the driver sitting comfortably in front of the crashed truck goes viral)

या फोटो मध्ये एक भला मोठा ट्रक रस्त्यावर पलटी झालेला दिसतोय. त्या ट्रकच्या काचा फुटलेल्या आहेत. ट्रकमधील कांदा रस्त्यावर इतरत्र पसरलेला पाहायला मिळतोय. पण ट्रकचा ड्रायव्हर मात्र शाही अंदाजात ट्रकच्या समोर आडवा पहुडेला दिसतोय. इतकच नाही तो फोनवर बोलताना आपल्याच धुंदीत मग्न असल्याचं या फोटोतून कळतं.

IPS अधिकाऱ्याकडून फोटो ट्वीट

हा फोटो आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी आपल्या ट्वीटर हॅन्डलवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. ‘याच्या शाही अंदाजामुळे लक्षात येतं की फोनवर दुसऱ्या बाजूला कोण आहे!’ असं कॅप्शन बोथरा यांनी दिलं आहे. बोथरा यांनी दिलेल्या कॅप्शनप्रमाणेच या ड्रायव्हरचा खास अंदाज आहे. पलटी झालेल्या ट्रकसमोर तो आरामात बसून फोनवर कुणाशी तर बोलत आहे.

सोशल मीडियावर लोक या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसंच खास कमेंट्सही करत आहेत. या फोटोला आतापर्यंत 8 हजारापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. फोटोवर एकाने कमेंट केली आहे की, ‘सर ये प्याज का भोकाल है’. दुसरा म्हणतोय, ‘प्यार का चक्कर है बाबू भैया!’ तर एकजण म्हणतोय की, ‘तो शंभर टक्के आपल्या प्रेयसीशी बोलतोय’.

इतर बातम्या :

Sara Ali Khan | ‘व्हिटामिन सीचा डेली डोस’, मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर बिकिनीत सारा अली खानचा जलवा!

‘The Kapil Sharma Show’ टीव्हीवर नाही, तर ‘इथे’ पाहता येणार! पाहा कीकू शारदा काय म्हणाला…

Photo of the driver sitting comfortably in front of the crashed truck goes viral